भुसावळ, जि.जळगाव : आपण स्त्रियांवर अन्याय करत आहोत ही बाब परंपरागत संस्कारांमुळे कित्येक पुरूषांच्या लक्षातच येत नाही. त्यामुळे जोपर्यंत पुरूष खऱ्या अर्थाने सुशिक्षित होत नाही तोपर्यंत स्त्रियांवरचे अत्याचार थांबणार नाही. स्त्रिचे अस्तित्व मानायला शिकवणे म्हणजे पुरूष शिक्षण. पुरूष सुशिक्षित झाल्यावरच त्याला स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ उमजेल, असे प्रतिपादन दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील कर्ते सुधारक कर्वे या पाठाचे लेखक डॉ.शिरीष गोपाळ देशपांडे यांनी केले.जळगाव जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे सुरू असलेल्या आॅनलाईन संवाद सत्राच्या दुसºया टप्प्यातील पहिल्या सत्रात ते बोलत होते.पहिल्या टप्प्यात पाच लेखक-कवीशी संवाद साधण्यात आला आणि आता दुसºया टप्प्यातही पाच लेखक-कवींशी संवाद साधला जात आहे.प्रारंभी मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ.जगदीश पाटील यांनी डॉ.देशपांडे यांचा परिचय करून दिला. त्यानंतर डॉ.देशपांडे यांनी महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्त्रीशिक्षण कायार्बाबत माहिती देऊन स्त्री-पुरुष एकाच पातळीवर आले पाहिजे यासाठी कर्वे यांनी केलेल्या कार्याची माहिती विशद केली.बोलके सुधारक असण्यापेक्षा कर्ते सुधारक असणे हेच श्रेयस्कर असल्याचेही त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देऊन डॉ.देशपांडे यांनी संवाद साधला. पुणे डायटचे अधिव्याख्याता डॉ.राजेश बनकर यांनी आॅनलाईन संवाद सत्र उपक्रमाचे कौतुक करून शिक्षक व विद्यार्थ्यांना थेट लेखक-कवींशी बोलता येण्याचा अविस्मरणीय आनंद घेता येत असल्याचे सांगितले.आगामी लेखक-कवी - दुसºया टप्प्यात पाच लेखक-कवी यांच्याशी रोज सकाळी १० वाजता संवाद साधण्यात येत आहे. दि.१६ जून रोजी आसावरी काकडे (खोद आणखी थोडेसे), दि. १७ रोजी डॉ.विजया वाड (बालसाहित्यिका : गिरीजा कीर), दि.१८ रोजी अरविंद जगताप (आप्पांचे पत्र) आणि दि. १९ जून २०२० नीरजा (आश्वासक चित्र) यांच्याशी संवाद साधला जाणार आहे.
पुरूष सुशिक्षित झाल्यावरच उमजेल स्त्री स्वातंत्र्याचा अर्थ : डॉ.शिरीष देशपांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 2:58 PM
जळगाव जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे सुरू असलेल्या आॅनलाईन संवाद सत्र सुरू झाले आहे.
ठळक मुद्देलेखक-कवींशी आॅनलाईन संवाद सत्राचा दुसरा टप्पा सुरूदहावीच्या पाठ्यपुस्तकातील लेखकांचा संवाद