बजरंग मूळचा खुड्डन, जि. झझ्झर येथील. त्याच्या वडिलांनाही कुस्तीचा शौक होता. त्यामुळे त्याने वयाच्या सातव्या वर्षीच कुस्तीला सुरूवात केली. आधी तो खुड्डन गावातच आखाड्यात जात होता. नंतर त्याच्या वडिलांनी त्याची प्रतिभा ओळखली आणि त्याच्यासाठी त्यांनी सोनिपतमध्ये स्थलांतर केले. तेथे साईच्या केंद्रात तो सराव करू लागला. त्यावेळी छत्रसाल स्टेडियमचे खूप नाव होते. त्यामुळे त्याने तेथे अर्ज केला. मात्र जागा खाली नसल्याने महाबली सत्पाल यांनी त्याला नकार दिला. नंतर एका कुस्ती स्पर्धेत छत्रसाल स्टेडियमचे प्रशिक्षक रामफल यांनी त्याचा कुस्ती सामना पाहिला. आणि त्याला घेऊन ते छत्रसाल स्टेडियममध्ये पोहचले.
त्याची कामगिरी
सिनियर विश्व चॅम्पियनशिप
२०१३ कांस्यपदक
२०१८ कांस्यपदक
२०१९ कांस्यपदक
आशियाई स्पर्धा
२०१४ रौप्य
२०१८ सुवर्ण
राष्ट्रकुल स्पर्धा
२०१४ रौप्य
२०१८ सुवर्ण
आशियाई चॅम्पियनशिप
२०१३ कांस्य
२०१४ रौप्य
टोकियो ऑलिम्पिक २०२१ कांस्य