जळगाव - डॉ़ पायल तडवी हिने जातीयवादातून आत्महत्या केली आहे़ ही घटना अत्यंत निदंनीय असून या प्रकरणातील दोषींना जन्मठेपेची शिक्षा व्हावी, यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाभरातील तरूणांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिले़ शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा छळ वाढला असल्याच्या प्रतिक्रियाही यावेळी तरूणांनी व्यक्त केल्या़ गुरूवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास जिल्हाधिकाऱ्यांना हे निवेदन देण्याचे नियोजन होते़ मात्र, भेटणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने अखेर निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे यांना निवेदन सादर करण्यात आले़ यावेळी पियूष पाटील, कल्पीता पाटील यांनी अधिकारी हुलवळे यांच्याशी चर्चा केली़ पायलची आत्महत्या ही जातीयवादातून झाली दोषींना जन्मठेपेची शिक्षा व्हावी, अशी मागणी पियूष पाटील यांनी यावेळी केली़ कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाल्यास समाज व अधिकाºयांमधील दुरावा मिटेल असेही ते म्हणाले़ आरोपींची सनद रद्द करावी, या प्रकरणात विशेष सरकारी वकीलांची नियुक्त करावी, पायलच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, अॅट्रॉसिटी कायदा अधिक मजबूत करण्यात यावा, महिलांसंदर्भात विशेष धोरणे आखण्यात यावी, या मागण्या यावेळी करण्यात आल्या़ यावेळी सुरज नारखेडे, अजय राणे, अजिंक्य पवार, अजिंक्य पाटील, अमोल कोल्हे, हिेतेष नारखेडे, अशफाक पिंजारी, सोज्वल पाटील, राहुल शर्मा, शंतनू नारखेडे, योगेश निंबाळकर, राकेश चौधरी, सारंग पवार, चेतन अटाळे, निखील केदार आदींची उपस्थिती होती़निवेदन देण्यासाठी तरूण येणार असल्याने सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता़. निवेदन देण्यासाठी तरूण जसे जिल्हाधिकारी कार्यालयात आले़ तसे पोलिसांनी तत्काळ त्यांची भेट घेत विचारणा केली़ आधी पोलीस प्रशासनाकडून विरोधही करण्यात आला होता़ घोषणाबाजी होईल, गोंधळ उडेल यामुळे पोलिसांनी बंदोबस्त लावला होता़ मात्र, तरूणांनी अगदी शांततेत निवेदन देत अधिकाºयांकडे आपले म्हणणे मांडले़
वैद्यकीय महाविद्यालयात छळवाद वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 12:39 PM