जळगाव : जिल्ह्यात प्रस्तावित वैद्यकीय महाविद्यालयाचे काम पूर्ण होईपर्यंत ते जिल्हा रुग्णालयात सुरू करण्याबाबत चर्चा सुरू आहे. त्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांनी जिल्हा रुग्णालयाकडे जागेची देखील मागणी केली आहे. जिल्ह्यात शासनातर्फे नवीन शासकीय वैद्यकीय शिक्षण संकुल उभारण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाकडून सुचविण्यात आलेल्या प्रस्तावित जागांची पाहणी करण्यासाठी प्रधान सचिव राजगोपाल देवरा गुरुवारी आले होते. त्यांनी जागेची पाहणी केली. त्यानंतर या विषयावरदेखील चर्चा केली. ‘आरोग्य’साठीही सोयीचे ठरणारजिल्हा रुग्णालयातून वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले तर वैद्यकीय शिक्षणाची सोय उपलब्ध होऊन येथे डॉक्टर उपलब्ध होण्यासदेखील मदत होणार असल्याने ते आरोग्य विभागाच्यादेखील सोयीचे ठरणार आहे. बांधकाम होईपर्यंत सुरुवातजिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार असून त्यासाठी जागांचे प्रस्ताव देखील आहे. मात्र त्या ठिकाणी बांधकाम व इतर कामे पूर्ण होईपर्यंत हे महाविद्यालय जिल्हा रुग्णालयात सुरू करण्यात यावे व त्यासाठी जागा मिळावी, या विषयी देवरा यांनी आढावा घेतला व जिल्हा रुग्णालयाकडे जागेची मागणीही केली.
वैद्यकीय महाविद्यालयाला ‘सिव्हिल’मधून सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2017 11:59 PM