आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ - जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत झाल्याने येथे मोठे बदल होत असून आता प्रत्येक विभागासाठी एका वैद्यकीय अधिकाºयाच्या जागी प्रत्येक विभागात विभाग प्रमुख ते वरिष्ठ निवासी अधिकारी असे सहा जण राहणार आहे. यामुळे उत्तम रुग्ण सेवा मिळण्यासह तक्रारीदेखील कमी होण्यास मदत मिळणार आहे.जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजूर झाल्यानंतर त्यासाठी चिंचोली येथे जागा निश्चित होऊन ती वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ताब्यातही देण्यात आली आहे. मात्र येथे इमारत उभारणी व इतर काम होईपर्यंत वैद्यकीय महाविद्यालायाची सुरुवात जिल्हा रुग्णालयातून होत आहे. यासाठी जिल्हा रुग्णालय वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आले असून येथे आवश्यक ते बदल केले जात आहे.या बदलांचा आढावा घेतला असता येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होत असले तरी त्याचे रुग्णालयाला नंतरही फायदे होणार असल्याचे सांगितले जात आहे.तक्रारी होणार कमीसध्या अस्थिविकार असो अथवा इतर कोणत्याही विभागाचे एक -एक वैद्यकीय अधिकारी येथे असतात. मात्र वैद्यकीय महाविद्यालय झाल्यास येथे प्रत्येक विभागासाठी एकूण सहा जण राहणार आहे.यामध्ये प्रत्येक विभागाचा विभाग प्रमुख, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, प्रपाठक, वरिष्ठ निवासी अधिकारी असे सहा जण एका विभागासाठी नियुक्त राहतील. विशेष म्हणजे या सहा जणांचे तीन गट राहणार असल्याने कोणाची सुट्टी असली तरी मनुष्यबळाचा प्रश्न राहणार नाही. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे चांगली रुग्णसेवा मिळण्यास मदत होईल व रुग्णांच्या तक्रारीदेखील कमी होतील, असे जाणकारांचे म्हणणे आहे.प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडूनही सेवावैद्यकीय शिक्षण सुरू झाल्यानंतर प्रशिक्षणार्थी डॉक्टरदेखील येथे राहतील. त्यामुळे रुग्णालयात रुग्णांची संख्या पाहता प्रशिक्षणार्थी डॉक्टरांकडूनही सेवा मिळून वेळेवर उपचार मिळण्यास मदत होणार आहे.तक्रारी होणार कमीजिल्हा रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून मंजूर पदांपैकी वैद्यकीय अधिकाºयांची संख्या केवल एक तृतीयांश आहे. त्यामुळे येथे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होतो. आता एका वैद्यकीय अधिकाºयाच्या जागी तब्बल सहा अधिकारी राहणार असल्याने जिल्हा रुग्णालयातील तक्रारी कमी होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.नवीन डॉक्टर तयार होऊन रिक्त पदांवर मातवैद्यकीय शिक्षण सुरू झाल्याने येथे नवीन डॉक्टर तयार होण्यासही मदत मिळणार आहे. येथे शिक्षण झाल्यानंतर ते किमान येथे सेवा बजावू शकतील व रिक्त पदांवर याद्वारेही मात करता येणे शक्य होणार आहे.जिल्हा रुग्णालयातून वैद्यकीय महाविद्यालयास सुरुवात होणार असल्याने येथे प्रत्येक विभागासाठी सहा अधिकारी राहतील. त्यामुळे तक्रारी कमी होण्यास मदत होईल.- डॉ. किरण पाटील, वैद्यकीय अधीक्षक.(क्रमश:)
वैद्यकीय महाविद्यालयामुळे डॉक्टर मिळून तक्रारी होणार कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 1:02 PM
मोठा बदल
ठळक मुद्देएका वैद्यकीय अधिका-याऐवजी राहणार सहा जणडॉक्टर मिळून तक्रारी होणार कमी