जळगाव : रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्टच्यावतीने जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात मेडिकल लायब्ररीचे उद्घाटन रोटरी ३०३० चे प्रांतपाल शब्बीर शाकीर यांच्याहस्ते करण्यात आले.
आँक्सिजन काॅन्सेंट्रेटर, मेडिकल पलंग, व्हील चेअर, वाॅकर, कमोड चेअर, काठी इत्यादी उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत. उद्घाटन प्रसंगी रोटरी डिस्ट्रीक ३०३० च्या सचिव टाॅबी भगवागर, सह सचिव डॉ. तुषार फिरके, चेअरमन अतुल शहा, उप प्रांतपाल डॉ. अपर्णा मकासरे, योगेश भोळे, प्रेसीडेंट एनक्लेव संगीता पाटील, विजयाबेन शहा, गीता शहा, निराली शहा, रोटरी जळगाव ईस्टचे माजी अध्यक्ष डॉ. जगमोहन छाबडा, वर्धमान भंडारी, सुनील शहा, सुशील असोपा, दिनेश कक्कड, विनोद पाटील, विरेंद्र छाजेड, प्रणव मेहता, शशी बियाणी, वल्लभ अग्रवाल, राजेश मुणोत, पियुश दहाड उपस्थित होते. हितेश्वर मोतीरामानी, प्रकल्प प्रमुख संग्रामसिंग सुर्यवंशी, संजय शहा, केवल शहा व सुनील वाणी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन संजय गांधी व डॉ.राहुल भंसाली यांनी केले.
या लायब्ररीचा उपयोग विशेषतः एमआयडीसी भागातील रुग्णांना होणार आहे. यासाठी ९, मार्केट यार्ड एमआयडीसी येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.