उत्तम काळे ।भुसावळ, जि.जळगाव : गेल्या १५ वर्षांपासून जेसीस आणि रोटरी क्लब आॅफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे संस्थापक म्हणून काम करत असताना वैद्यकीय क्षेत्रात सर्वच ठिकाणी करण्यात आलेली सेवा ही जीवनातील सर्वात मोठी सेवा असून, यातून मिळणारा आनंद हा शब्दात व्यक्त करू शकत नाही, अशा भावना मुकेश अग्रवाल यांनी व्यक्त केल्या आहेत.रोटरी आंतरराष्ट्रीय परिवारातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा सामाजिक क्षेत्रातील ‘एव्हेन्यू आॅफ सर्विस सायटेशन’ हा पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर ‘लोकमत’शी ते बोलत होते.प्रश्न : कुटुंबात सेवेचा वारसा आहे का?उत्तर : १९९६ पूर्वी पुणे येथे शिक्षण घेतले. यानंतर भुसावळ येथे दाखल झालो व वडिलांनी चालवलेला सामाजिक क्षेत्रातील वारसा पुढे चालवण्याची संधी मिळाली. वडील वेदप्रकाश अग्रवाल हेही रोटरीचे सदस्य होते.प्रश्न : सेवेचे असे काही ठरवले होते का?उत्तर : वडिलांचे ब्रीदवाक्य होते ‘अपने लिये जिये तो, क्या जिये’ ‘ये दिल जिये जमाने के लिये’ हे ब्रीद घेऊनच समाज कार्यात काम करण्याचे निश्चित केलेले धोरण आजही कायम आहे.प्रश्न : बेवारस प्रेतांची विल्हेवाट लावण्यासाठीही पुढाकार असतो?उत्तर : रेल्वे स्थानकावरील बेवारस प्रेत असो, की रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना औषधोपचाराची गरज असो, आपण नेहमी या कामासाठी तत्पर राहिलो. हे सर्व करीत असताना रोटरी क्लब आॅफ भुसावळ ताप्ती व्हॅलीच्या सर्व सदस्यांचे सहकार्य लाभते.रुग्णसेवेला प्राधान्यलग्नसमारंभांपेक्षा आजारपणातील रुग्णांची सेवा करण्याला आपण विशेष महत्त्व देतो. शहरात प्रथम रोटरी क्लबच्या माध्यमातून शवपेटी आणली, तर तत्कालीन डीवाय.एसपी. रोहिदास पवार यांच्या कारकीर्दीमध्ये शहरात आठ ठिकाणे सीसीटीव्ही कॅमेरेही लावले. अॅम्बुलन्स उपलब्ध करून दिली, तर एक कोटी रुपये खर्च करून मॅमोग्राफी व्हॅन उपलब्ध केली आहे. ही व्हॅन सध्या अकोला येथे असून विदर्भात फिरत आहे. महिलांना कॅन्सरचा उपचार करण्यासाठी यांचा उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले. घरात कधीच वाढदिवस साजरा केला जात नाही. हा वाढदिवस आम्ही संकटात, दु:खात असलेल्या लोकांच्या सुख दु:खात सहभागी होऊन साजरा करतो, असे ते नमूद करतात.
वैद्यकीय क्षेत्रातील सेवा सर्वात मोठी- मुकेश अग्रवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 3:07 PM
गेल्या १५ वर्षांपासून जेसीस आणि रोटरी क्लब आॅफ भुसावळ ताप्ती व्हॅलीचे संस्थापक म्हणून काम करत असताना वैद्यकीय क्षेत्रात सर्वच ठिकाणी करण्यात आलेली सेवा ही जीवनातील सर्वात मोठी सेवा असून, यातून मिळणारा आनंद हा शब्दात व्यक्त करू शकत नाही, अशा भावना मुकेश अग्रवाल यांनी व्यक्त केल्या आहेत.
ठळक मुद्देसेवेतून मिळणारा आनंद अवर्णनीय असतो‘अपने लिये जिये तो क्या जिये, ये दिल जिये जमाने के लिए’ हे वडिलांचे ब्रीद घेऊनच समाज कार्य करण्याचे धोरण आजही कायमसंडे स्पेशल मुलाखत