जळगाव : मीनाक्षी चौधरी (वय ८०, रा. मूळ रा. ममुराबाद, हल्ली मुक्काम मुंबई) यांचे ४ रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, जावई आणि नातवंडे, असा परिवार आहे. या गिरीश दयाराम चौधरी यांच्या मातोश्री होत.
रामकृष्ण अस्वार
शिरसोली : शिरसोली येथील रामकृष्ण ओंकार अस्वार यांचे ४ रोजी दुपारी निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे, असा परिवार आहे. ते प्रदीप अस्वार यांचे वडील होत.
शब्बीर पिंजारी
शिरसोली : येथील शब्बीर हमीद पिंजारी यांचे ४ रोजी सकाळी अल्पश: आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, मुली, जावाई, नातवंडे असा परिवार आहे. ते माजी सरपंच मुस्ताक हमीद पिंजारी यांचे बंधू होत.
शुभम काटोले
शिरसोली : येथील रहिवासी शुभम भरत काटोले यांचे ४ एप्रिल रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते भरत देवीदास काटोले यांचे चिरंजीव होत.
सीताराम काटोले
जळगाव : सीताराम काटोले यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
सुशीला पाटील
जळगाव : सुशीला पाटील (वय ६४, रा. भवानी पेठ) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्या रितेश पाटील यांच्या आई होत.
वत्सलाबाई खडके
जळगाव : वत्सलाबाई खडके (वय ७९, रा.योगेश्वरनगर) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्या भास्कर खडके व राजेंद्र खडके यांच्या आई होत.
चंदन मलिक
जळगाव : चंदन (भगवानदास) तेजभान मलिक ( वय ६६, सिंधी कॉलनी ) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यावर नेरी नाका स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.