भुसावळ, जि.जळगाव : अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकूच हरिद्वार, शाखा भुसावळद्वारा आयोजित तीन दिवसीय निवासी कन्या कौशल्य शिबिराची कन्यापूजनाने सांगता झाली.भुसावळ येथील पुरुषोत्तम नगरातील गायत्री शक्तीपिठात झालेल्या शिबिरात जिल्ह्यातील १९० महाविद्यालयातील युवतींनी सहभाग नोंदवला होता.या शिबिरात व्यक्तिमत्त्व विकास अंतर्गत मस्तिक प्रशिक्षण, ज्ञान आणि कौशल्य प्राप्त व्हावा या हेतूने शिक्षण, स्वावलंबन, समानता, सुरक्षा, सुसंस्कार याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. युवतींना सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैचारिक, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील समस्यांची उकल कशी करावी याविषयी जाणीव, भावी पिढीला दिशा, आपले निर्णय क्षेत्र व्यापक व्हावे हे दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून स्वत: कणखरपणाने निर्णय घेण्याची क्षमता याबाबत माहिती देण्यात आली.जागरण, ध्यान धारणा, योग, व्यायाम, यज्ञ शिक्षण, बौद्धिक याद्वारा मार्गदर्शन, सायंकाळी शिबिरार्थींची प्रश्नोत्तर चर्चा या स्वरूपात दैनंदिन कार्यक्रम निश्चित करण्यात आले होते. शांतीकुंज हरिद्वारच्या प्रतिनिधी संध्या तिवारी, माधुरी वर्मा, निधी विश्वकर्मा, सुषमा पवार यांनी मार्गदर्शन केले. समारोपप्रसंगी शिबिरार्थींनी मनोगत व्यक्त केले.
भुसावळात कन्या कौशल्य शिबिराची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2019 4:43 PM
अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकूच हरिद्वार, शाखा भुसावळद्वारा आयोजित तीन दिवसीय निवासी कन्या कौशल्य शिबिराची कन्यापूजनाने सांगता झाली.
ठळक मुद्देअखिल विश्व गायत्री परिवाराचा उपक्रमतीन दिवसीय शिबिरात जिल्ह्यातील १९० महाविद्यालयातील युवतींचा सहभागयुवतींना सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैचारिक स्तरावरील प्रशिक्षणशिबिराची कन्यापूजनाने सांगता