लोकमत न्यूज नेटवर्कचोपडा : चहार्डी येथील सहकारी साखर कारखान्यावर आलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पड्यासाठी सदर कारखाना आगामी २५ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्याचे ठरले आहे. खासगी व्यापाऱ्याकडून मिळालेल्या पैशांमधून विगतवारी करण्यासाठी १५ रोजी ऊस उत्पादक, सभासदांची सभा आयोजित केली आहे.चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक अडचणीत सापडला होता. कारखान्याचे संचित तोटे व नेटवर्क उणे असल्याने फायनान्स उपलब्धतेसाठी अडचणींतून मार्ग निघाला असून ५ कोटी रकमेचा डी.डी. (धनाकर्ष) देखील प्राप्त झाला आहे. सदर रकमेतून प्रथम प्राधान्याने सन २०१७-१८ चे थकीत ऊस पेमेंट, कर्मचारी पगार दिवाळीपूर्वी देण्याबाबत तसेच सन २०१९-२० च्या गाळप हंगामात उपलब्ध होणारा ऊस पुरवठा व सदर रकमेची विगतवारी, तद्अनुशंगिक बाबींवर चर्चा होणार आहे. यासाठी कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादक, सभासद यांची संचालक मंडळासमवेत विशेष सर्वसाधारण सभा (शेतकरी मेळावा) १५ रोजी मंगळवारी सकाळी ११ वाजता कारखाना कार्यस्थळावर आयोजित केली आहे. तरी सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन अतुल ठाकरे व संचालक मंडळाने केले आहे. ही माहिती कार्यकरी संचालक अकबर पिंजारी यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
चोसाकाच्या थकीत पेमेंटबाबत १५ रोजी सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 8:48 PM