जळगाव : जिल्ह्यात दुष्काळ घोषित करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीची बैठक २२ आॅक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे.जिल्ह्यात पावसाने मोठ्या प्रमाणावर खंड दिल्याने व केवळ ६३.८ पाऊस झाल्याने जिल्हा दुष्काळी जाहीर करण्याची मागणी होत असताना केंद्र शासनाच्या दुष्काळ व्यवस्थापन संहितेनुसार राज्य शासनाने पद्धती तयार केली आहे. त्याअनुषंगाने निकष लावून दुष्काळ घोषीत करण्यात येणार आहे. जिल्ह्यात १३ तालुके गंभीर दुष्काळाच्या निकषात पात्र ठरले आहेत.यामध्ये जिल्ह्यात दुष्काळ घोषित करण्यासंदर्भात जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समिती स्थापन करण्यात आली आहे. दुष्काळ घोषित करण्याबाबतच्या निर्देशानुसार या समितीने अंतिम अहवाल सादर करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली २२ आॅक्टोबर रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे.या संदर्भात अपर जिल्हाधिकारी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभाग, महावितरण, भूजल सर्वेक्षण, कृषी अधिकारी, जि.प. कृषी विभाग, वन विभाग, पशू संवर्धन विभाग यांना पत्र देऊन निमंंत्रित करण्यात आले असल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी दिली.
दुष्काळीस्थितीचा अंतिम अहवाल सादर करण्यासाठी सोमवारी जळगावात समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 12:19 PM