नियमांचे पालन करण्याचे आवाहन
जळगाव : शहर व जिल्हावासियांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने जनता कर्फ्यू जाहीर केला असून त्यास सहकार्य करण्याचे आवाहन कॅट संघटनेने केले आहे. व्यापारी बांधवांसह सर्वांनीच प्रशासनाला साथ दिल्यास कोरोना नियंत्रणात येऊ शकेल, असे आवाहन संघटनेचे राज्य वरिष्ठ उपाध्यक्ष पुरुषोत्तम टावरी, उपाध्यक्ष दिलीप गांधी, सचिव प्रवीण पगारिया, जिल्हाध्यक्ष संजय शहा यांनी केेले आहे.
आज साफसफाई
जळगाव : महापालिका क्षेत्रात घोषित केलेल्या जनता कर्फ्यूदरम्यान सर्वच व्यवहार बंद राहणार असल्याने या काळात दाणाबाजार असोसिएशनच्या वतीने करण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेतंर्गत रविवारीही साफसफाई केली जाणार आहे.
धुळीमुळे वाहनधारक त्रस्त
जळगाव : प्रभात चौकातील महामार्गाच्या वळण रस्त्यांवर माती असल्याने या ठिकाणाहून वाहन जाताना मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. यामुळे वाहनधारकांसह परिसरातील व्यावसायिक त्रस्त झाले आहेत.
अपघाताचा धोका
जळगाव : मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांना चावा घेण्याच्या मोठ्या प्रमाणावर घडना घडत आहेत. यात रामानंदनगर परिसरातही रात्रीच्या वेळी कुत्रे वाहनांच्या मागे लागत असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.