ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 31 - अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील तलाठी योगेश रमेश पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळाधिका:यांनी सुरू केलेल्या लेखणी बंद आंदोलनासंदर्भात मंगळवारी तलाठी संघाचे पदाधिकारी, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची बैठक झाली. यामध्ये आरोपींना अटक करण्याचे केवळ आश्वासन मिळाल्याने बोलणी फिस्कटून तलाठी बांधव बंदवर ठाम आहे. दरम्यान, आरोपींना लवकर अटक झाली नाही तर राज्यभर बंद पुकारण्याचा इशारा तलाठी संघाने दिला आहे. अमळनेर तालुक्यातील पिंगळवाडे येथील तलाठी योगेश रमेश पाटील यांना 17 जानेवारी रोजी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत मारहाण करण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळाधिका:यांनी 18 जानेवारीपासून लेखणी बंद आंदोलन सुरू केले असून ते 13 दिवसांनंतरही सुरूच आहे. आता या आंदोलनात नाशिक विभागातील तलाठीदेखील सहभागी झाले असून 24 जानेवारीपासून संपूर्ण विभागात लेखणी बंद सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर मंगळवार, 30 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल मुंडके, पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांची तलाठी संघासोबत बैठक झाली. जवळपास अर्धा तास चाललेल्या या बैठकीत कोणताही ठोस निर्णय न झाल्याने बैठक निष्फळ ठरली. आरोपींना अटक करण्याचे केवळ आश्वासन देण्यात आले, मात्र ठोस कारवाई नसल्याने तलाठी संघाचे पदाधिकारी आरोपींना तत्काळ अटकेच्या मागणीवर ठाम असून बंद सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या वेळी जिल्हा तलाठी संघाचे जिल्हाध्यक्ष एन.आर. ठाकूर, संघटक व्ही.आर. मानकुंभरे, सरचिटणीस जे.डी. बंगाळे, खजिनदार सचिन जगताप उपस्थित होते.
राज्यभरात लेखणी बंदची लवकरच घोषणादोषींना अटक होत नसल्याने जिल्हा बंद नंतर विभागातही लेखणी बंद आंदोलन सुरू झाले आहे. आजही ठोक कारवाई होत नसल्याने आता राज्यभरात लेखणी बंद करण्याची लवकरच तारीख निश्चित करण्यात येणार असल्याचे जे.डी. बंगाळे यांनी सांगितले. दरम्यान, या संदर्भात 29 जानेवारी रोजी जळगाव जिल्हा तलाठी संघाच्या पदाधिका:यांनी विभागीय आयुक्त महेश झगडे यांचीदेखील भेट घेतली होती. प्रशासकीय कामेही रेंगाळलेतलाठींच्या लेखणी बंदमुळे प्रशासकीय कामेही रेंगाळली असल्याचे अधिका:यांमार्फतच सांगितले जात आहे. सातबारा संगणीकरणाचे काम 10 टक्क्याने खाली आले असून वसुलीही ठप्प झाली आहे.
तलाठी लेखणी बंद संदर्भात त्यांच्याशी चर्चा करण्यात येऊन बंद मागे घेण्याची विनंती करण्यात आली. पोलीस अधीक्षकांसह माङयामार्फत कार्यकवाही सुरू आहे. - किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी.