ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि.6 - राज्य शासनाने हिंगोणा येथे टिश्यू कल्चर केंद्र, पाल येथी कृषी संशोधन केंद्र व चाळीसगाव येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली आहे. या कामांना गती मिळावी यासाठी लवकरच कृषीमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लावण्याचे आश्वासन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या सभेत दिले.
जिल्हा नियोजन समितीची बैठक येथील नियोजन भवन येथे पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्जवला पाटील, खासदार ए. टी. नाना पाटील, खासदार रक्षा खडसे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, महापौर नितीन लढ्ढा, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर उपस्थित होते.
शेती क्षेत्रात होणारे अमुलाग्र बदल लक्षात घेऊन शेतीला शाश्वत शेतीकडे नेण्यासाठी जिल्हयात होणा:या केळी व कापूस उत्पादनासाठी ठिबकचा जास्तीत जास्त वापर वाढला पाहिजे. यासाठी शेतक:यांना आवश्यक अनुदान उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून तरतूद करण्यात येईल. तसेच समुह शेती व गटशेतीकडे वळण्यासाठी शेतक:यांना प्रोत्साहित करण्यात यावे. शेतीक्षेत्राला चालना देण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर शेतीला आवश्यक असणारी वीज त्वरीत उपलब्ध व्हावी यासाठी प्रलंबित असलेले वीज कनेक्शन देण्यासाठी आवश्यक ती तरतूद उपलब्ध करुन देण्यात येईल. जिल्हयातील ज्या पाडय़ांवर अद्याप वीज पोहोचली नाही अशा ठिकाणी वीज उपलब्ध करुन देण्यासाठी सौर उर्जेवर चालणारे युनिट तयार करण्याच्या सुचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
तसेच महापालिका व नगरपालिका हद्दीतील शेतक:यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा यासाठी कृषीमंत्र्यांकडे बैठक घेण्यात येईल. केळी पिकावरील करपा रोगाचे निमरूलन होण्यासाठी केंद्र सुरु केले होते. ते काम सध्या बंद असल्याने ते पुन्हा सुरु करण्यासाठी तातडीने प्रस्ताव पाठवावा. लघुपाटबंधारे प्रकल्पातील शेतक:यांना लाभक्षेत्र अनुदान मिळाले नसल्यास त्याची चौकशी जिल्हाधिकारी यांनी करावी. जिल्हयातील वैद्यकीय अधिका:यांच्या रिक्त जागा तातडीने भरण्यासाठी शासन स्तरावरुन आवश्यक कार्यवाही करण्यात येईल. तसेच कवियत्री बहिणाबाई, बालकवी ठोंबरे व पुण्योक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असेही यावेळी पालकमंत्र्यांनी दिले.
बैठकीस आमदार स्मिता वाघ, आमदार चंदू पटेल, हरिभाऊ जावळे, सुरेश भोळे, किशोर पाटील, संजय सावकारे, शिरीष चौधरी, चंद्रकांत सोनवणे, उन्मेष पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.