जळगाव,दि.18- जिल्हा परिषदेत 10 समित्यांवर जि.प.तील सर्व 67 सदस्यांसह पं.स.च्या 15 सभापतींच्या निवडीसाठी मंगळवारी जि.प.त आयोजित सर्वसाधारण सभा फक्त 15 मिनिटात सदस्यांची निवड न करताच गुंडाळण्यात आली. सभेत सर्वपक्षीय गटनेत्यांनी सदस्यांच्या समितीमधील नियुक्तीचे अधिकार अध्यक्षांना बहाल केले, पण सभेत कुठल्याही सदस्याची कुठल्याही समितीवर नियुक्ती झाली नाही किंवा तशी घोषणा झाली नाही. तसेच जि.प.तील उपाध्यक्ष व दोन सभापतींना कुठल्या समित्या जाहीर झाल्या हेदेखील सभेत ठरले नाही. यामुळे या निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे. परंतु ही निवड प्रक्रिया पारदर्शकपणे राबविली आहे. मागील पंचवार्षिकमध्येही अशाच पद्धतीने निवड प्रक्रिया पार पडल्याचे जि.प.च्या प्रशासनाने म्हटले आहे. या प्रकारासंदर्भात काही सदस्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती मिळाली.
समित्यांवर सदस्यांची निवड न करताच जि.प.त सभा गुंडाळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2017 5:13 PM