आॅनलाईन लोकमत जळगाव, दि.७- मेहरूण तलावाच्या सुशोभिकरणाचे प्रयत्न सुरू असताना व त्यावर कोट्यवधीचा निधी खर्च केला जात असताना तलावात व तलावाच्या परिसरात मात्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नुसतेच सुशोभिकरण करून उपयोग काय? असा सवाल उपस्थित होत आहे. महापौरांनी मेहरूण तलाव पर्यटनस्थळ म्हणून विकसित व्हावे, यासाठी लोकसहभागातून तसेच जलसंपदा विभागाच्या मदतीने त्यातील गाळ काढण्याची मोहीम राबविली. तसेच मनपाला डीपीडीसीतून मिळालेल्या निधीतून गणेश घाटाचे काम करण्यात आले. त्यानंतर टप्याटप्प्याने मिळालेल्या निधीतून तलावाच्या मुख्य बांधाचे मजबुतीकरणाचे काम करण्यात आले. तसेच तलावाच्या काठाने जॉगींग ट्रॅक, रेलिंग व सुशोभिकरणाचे काम प्रस्तावित केले आहे. मात्र हे करताना तलावात गुरे, वाहने धुण्यासाठी आणणे थांबविणे आवश्यक असताना त्यादृष्टीने प्रयत्नच झालेले नाहीत. गणेश घाटाच्या ठिकाणी गुरांना पायºयांकडे जाता येऊ नये यासाठी लोखंडी बार बसविण्यात येणार होते. गणेशघाटाच्या कामातच ते प्रस्तावित होते. मात्र ते लोखंडी बार बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच गुरे या घाटाच्या पायºयांवरून पाण्यापर्यंत जातात. त्यामुळे गणेश घाटाच्या पायºयांवर शेण पडलेले असते. तसेच नागरिकांना निर्माल्य टाकण्यासाठी गणेश घाटाच्या कोपºयावरच कुंडी ठेवलेली असतानाही नागरिक पाण्यात निर्माल्य तसेच कचरा टाकतात. त्यावर निर्बंध आणण्यासाठी तेथे कुणीच नसल्याने नागरिकांचे फावते. तसेच तलावाच्या पाण्यात टाकलेला तसेच पायºयांवर पडलेला कचरा देखील नियमितपणे साफ केला जात नसल्याने सुशोभिकरणावर कोट्यवधी खर्च करूनही परिसराला अवकळा आलेली दिसते. त्यातच या तलावाच्या पाण्यातच कपडे धुतले जातात. ते तलावाच्या पायºयांवर वाळत टाकले जातात. त्यालाही निर्बंध घालण्याची गरज आहे. मात्र मनपा प्रशासनाचे त्याकडे सोयीस्कर दूर्लक्ष होत आहे.
मेहरूण तलावाचे सुशोभिकरण होतेय, सफाईचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 6:45 PM
जळगाव मनपाचे होतेय दुर्लक्ष: सफाईची मागणी
ठळक मुद्देसुशोभिकरणावर कोट्यवधीचा निधी खर्चसफाईकडे मात्र दूर्लक्षतलावात धुतली जाताय गुरे व वाहने