जळगाव : शहराचे वैभव आणि मानबिंदू असलेल्या मेहरुण तलावासाठी भगीरथ ठरत असलेल्या ब्रिटीशकालीन अंबरझरा तलावातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होण्यासह सतत सुरु असलेल्या पावसामुळे मेहरुण तलाव १०० टक्के भरून सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहू लागले आहे. सहा वर्षांनतर पुन्हा एकदा मेहरुण तलाव ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने शहरवासीयांना हा सुखद चित्र अनुभवता येत आहे. तलाव यंदा पूर्ण भरल्याने शहरातील कुपनलिकांनाही मोठा आधार होणार असून आतापासूनच पिकांनाही लाभ होत आहे.मेहरुण तलाव हा पूर्वीपासूनच शहरवासीयांचे खास आकर्षण केंद्र असून त्याचे जतन करण्यासाठी पर्यावरणप्रेमीही हातभार लावत आहेत. मात्र गेल्या काही वर्षात या भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम वाढल्याने मेहरुण तलावाच्या स्त्रोतावर मोठा परिणाम झाला आहे. पावसाळ््यात मेहरुण तलावामध्ये लांडोरखोरीसह आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात पाणी येत असे मात्र बांधकाम वाढल्याने हे स्त्रोत इतरत्र वळले आहे. परिणामी मेहरुण तलावामध्ये पाण्याचे प्रमाण कमी-कमी होत आहे. परिणामी महरुण तलाव गेल्या काही वर्षांपासून पूर्ण भरत नव्हता.मात्र यंदा मेहरुण तलावाला ब्रिटीशकालीन अंबरझरा तलावाचा मोठा आधार झाला. या वर्षी उन्हाळ््यात वृक्ष संवर्धन समितीच्यावतीने पुढाकार घेण्यात येऊन अंबरझरा तलावापासून मेहरुण तलावापर्यंत चार कि.मी. लांबी व १५ फूट खोलीची चारी तयार केली. त्यामुळे पुन्हा अंबरझऱ्यातील खळखळाट मेहरुण तलावाकडे वळला. तंत्रशुद्ध चाºया तयार झाल्याने तीन आठवड्यांपूर्वी ८० टक्के भरलेल्या मेहरुण तलावाचा साठा आता १०० टक्क्यांवर पोहचला आहे.सिमेंटचेकॅनॉल तयार करणारअंबरझरापासून ते मेहरुण तलावापर्यंत सध्या चाºया तयार केल्या असल्या तरी पुढील वर्षी जिल्हा नियोजन विकास समितीकडून निधी मिळवून या ठिकाणी सिमेंटचे कॅनॉल तयार करून त्यावर चार-पाच ठिकाणी छोटे पूल तयार करण्याचे प्रयत्न राहणार असल्याचे तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे सेवानिवृत्त अधीक्षक अभियंता व्ही.डी. पाटील यांनी सांगितले.मेहरुण तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे या तलावात पाणी असल्यास शहरातील कुपनलिकांनाही वर्षभर पाणी राहते. यंदा तलाव भरल्याने कुपनलिकांची चिंता मिटली आहे. सोबतच तलावाची साठवण क्षमता वाढल्याने पाणी आजूबाजूच्या शेतात जात नसल्याने पिकांचेही नुकसान होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे कुपनलिकांना आधार होण्यासह पिकांचे नुकसान टळत असल्याने दुहेरी लाभ होत असल्याचे सुखद चित्र आहे.पक्षांचा अधिवास वाढणारतलावात पाणी कमी आल्याने जानेवारी-फेब्रुवारी महिन्यातच तलाव आटत असे. मात्र यंदा तलाव पूर्ण भरल्याने मार्च अखेरपर्यंत पाणी राहू शकणार आहे. त्यामुळे येथे बाहेरून येणाºया पक्षांनाही आधार होऊन त्यांचा अधिवास वाढू शकेल, असा विश्वास पक्षीमित्रांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनाने कृत्रिम अंडी टाकून मासे वाढीसाठी प्रयत्न केल्यास पक्षांना खाद्य मिळेल व विविध जातीचे पक्षी तलावाकडे वळतील, असेही सूचविले जात आहे.सांडपाणी रोखावेमेहरुण तलावात येणारे सांडपाणी अद्यापही बंद झालेले नाही. त्यामुळे तलावातील पाणी निळे दिसत नाही तर ते दुषीत असल्याची खंत पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत.
सहा वर्षांनतर मेहरुण तलाव ‘ओव्हर फ्लो’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 11:51 AM