गाडी क्रमांक (०११३५) ही गाडी १५ आणि २९ रोजी भुसावळहून सकाळी ६:१५ वाजता सुटून पुण्याला सायंकाळी पावणे पाच वाजता पोहचणार आहे. तर परतीला (क्रमांक ०११३६) ही गाडी १६ आणि ३० एप्रिल रोजी पुण्याहुन सकाळी ११: ३० वाजता सुटून जळगावला रात्री पावणेनऊ वाजता पोहचणार आहे. पूर्वीच्या हुतात्मा एक्स्प्रेस प्रमाणे ही गाडी असून, या गाडीला सर्व ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. तसेच या गाडीलाही आरक्षण सक्तीचे करण्यात आले असल्याने रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.
विनामास्क प्रवाशांवर कारवाईची मागणी
जळगाव : सध्या कोरोनाच्या भयावह परिस्थितीतही अनेक प्रवासी विनामास्क रेल्वेत प्रवास करतांना दिसून येत आहेत.यामुळे कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.तरी रेल्वे प्रशासनाने या बेजबाबदार प्रवाशांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
विदर्भ एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी
जळगाव जळगावहून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्स्प्रेसला गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी वाढत आहे. यामुळे जनरल बोगींना अनेक प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागत आहे.तरी रेल्वे प्रशासनाने मुंबई गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसला जादा डबे जोडण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
नवीन बस स्थानकातील पाणपोई बंद
जळगाव : शहरातील एका सामाजिक संस्थेने गेल्या वर्षी नवीन बस स्थानकात बसविलेली पाणपोई वर्षभरातच बंद पडली आहे. थंड पाण्याची सोय असलेली ही पाणपोई संबंधित सामाजिक संस्थेने लक्ष न दिल्यामुळे बंद पडली असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याअभावी प्रवाशांचे हाल होत आहेत.
रेल्वे स्थानकावर थंड पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय
जळगाव : जळगाव रेल्वे स्थानकावर सध्या उन्हाळा सुरू असतांनाही प्रवाशांना स्टेशनवरील पिण्याच्या टाक्यांमधून साध्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. या प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने तत्काळ या टाक्यांमधील थंड पाण्याचे कुलर चालू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
जुन्या बस स्थानकात पथदिवे बसविण्याची मागणी
जळगाव : शहरातील जुन्या बस स्थानकातून गेल्या आठवड्यापासून बससेवा पुन्हा सुरू झाली आहे. ग्रामीण भागातील बसेस या आगारातून सोडण्यात येत असल्याने नागरिकांची वर्दळ वाढली आहे. मात्र,आगारात रात्रीच्या वेळी पुरेसे पथदिवे नसल्यामुळे अनेक ठिकाणी अंधार पसरलेला असतो.त्यामुळे आगार प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व ठिकाणी पथदिवे बसविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.