शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

महिलांप्रमाणे पुरुषांनाही कायद्याचे संरक्षण द्यावे - जळगावात ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 1:01 PM

पुरुष हक्क समितीच्या अधिवेशात ४ महत्त्वपूर्ण ठराव

जळगाव : महिलांना ज्या प्रमाणे कायद्याचे संरक्षण आहे, त्याच प्रमाणे पुरुषांनाही देण्यात यावे, पुरुषांनाही पोटगी मिळावी, पुरुषांचा तेजोभंग झाल्यास स्त्रियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच पुरुष आयोग स्थापन करावा असे चार महत्त्वपूर्ण ठराव पुरुष हक्क संरक्षण समितीच्या २१ व्या राष्ट्रीय अधिवेशनात करण्यात आले. हे ठराव सराकारनेही मंजूर करावेत, यासाठी पाठपुरावा करण्याचेही ठरले.जळगावात आयोजित दोन दिवसीय अधिवेशाचा समारोप रविवारी सायंकाळी झाला. राज्यअध्यक्ष डॉ. सुनिल घाडगे, सचिव अ‍ॅड. धर्मेद्र चव्हाण (नाशिक), समन्वयक अ‍ॅड.बाळासाहेब पाटील (सांगली), जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. जयेश भावसार , अ‍ॅड. मधुकर भिसे (धुळे) आदिंची मुख्य उपस्थिती होती.अधिवेशनात मंजूर झालेले ठरावठराव क्रमांक १- पुरुषाचा तेजोभंग या कलमाचा अंतर्भाव करावाअलिकडच्या काळात अनेक स्त्रियांच्या राहणीमानात बदल झाला आहे. पुरुषांच्या लैंगिक भावना चाळवतील इतके अध:पतन त्यांच्या वेशभूषेत झाले आहे. यामुळे पुरुषांचा वारंवार तेजोभंग होतो. मात्र याबाबत कोणतेही कलम नाही. स्त्रिचा विनयभंग झाला तर ३४५ चा अंतर्भाव आहे. त्याचप्रमाणे पुरुषांचा तेजोभंग झाल्यास स्त्रियांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी ३५४- अ असे कलम निर्माण करावे.ठराव क्रमांक २- .... तर पुरुषालाही मिळवी पोटगीपुरुषाने पत्नीचा विनाकारण त्याग केल्यास कलम १२५ अन्वये पत्नीला पोटगी द्यावी लागते. दरम्यान अलिकडे काही स्त्रिया या पुरुषांना कोणतेही कारण नसताना मुलाबाळांसहीत परित्याग करतात. वैवाहिक सुख देण्यास नकार देतात. अशा स्त्रियांना चपराक बसण्यासाठी त्या पुरुषाचे पुन्हा लग्न होईपर्यंत त्यास अशा पत्नीकडून पोटगी मिळावी यासाठी १२५- अ या कलमाची निर्मिती करावी.ठराव क्रमांक ३- घरगुती हिंसाचार कायद्यात दुरुस्ती करावीघरगुती हिंसाचार कायद्यातील काही कलमांमुळे पुरुषांवर अन्याय होण्याची भिती अधिक आहे. या कायद्यात पुरुषांना आपली बाजू मांडण्यास वाव नाही. यामुळे काही चारित्र्यहीन, अहंकारी स्त्रिया या कायद्याचा दुरुपयोग करीत आहेत.त्यामुळे या कायद्यात दुरुस्ती करावी.ठराव क्रमांक ४- पुरुष आयोग नेमावामहिलेस अबला मानून महिला आयोग, महिला दक्षता समिती, मोफत कायदा सल्ला आदींचे पाठबळ त्यांना देण्यात आले. परंतु आता महिला शिक्षणामुळे व आर्थिक स्थितीमुळे अबला राहिल्या नसून बऱ्याचदा कायद्याचा दुरुपयोग पुरुषांविरुद्ध त्या करतात. यामुळे पुरुषांना न्याय देण्यासाठी पुरुष आयोग स्थापन करुन जिल्हास्तरावर पुरुष दक्षता समित्यांची स्थापना करण्यात यावी.पुरुषमित्र पुरस्काराने गौरवचांगले कार्य केल्याबद्दल नारायण मोरे (नाशिक), विलास देवरकर (गणपतीपुळे), रवींद्र दरक (नागपूर) यांना यंदाचा पुरुषमित्र पुरस्कार देण्यात आला.

टॅग्स :Jalgaonजळगाव