जळगाव : तंत्रशिक्षणाचे महत्व, करिअर तसेच नोकरीच्या व स्वयंरोजगाराच्या संधी याचे सखोल मार्गदर्शन मिळावे, यासाठी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्यावतीने स्कूल कनेक्ट हा उपक्रम राबविण्यात येत असतो. या उपक्रमातंर्गत जिल्ह्यातील हजारावर विद्यार्थ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये स्कूल कनेक्ट हा उपक्रम आॅनलाईन पध्दतीने राबविण्यात आला. त्यात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. एरंडोल, भुसावळ, पारोळा, भडगाव, यावल, मुक्ताईनगर, जळगाव आदी तालुक्यांमधील शाळांमधील हजारावर विद्यार्थ्यांनी उपक्रमात ऑनलाईन पध्दतीने सहभाग नोंदविला होता. या उपक्रमासाठी प्रा.बी.एम.चौधरी व प्रा.ब-हाटे यांनी परिश्रम घेतले.