गो. से. हायस्कूल, पाचोरा
गो. से. हायस्कूलचा शंभर टक्के निकाल जाहीर झाला असून, ४१८ पैकी ३२६ विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले, तर ९२ विद्यार्थ्यांना प्रथम श्रेणी प्राप्त झाली असून खालील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. दीपाली प्रल्हाद सोनवणे (९९ टक्के), ऋषिकेश राकेश न्याती (९८ टक्के), ललित विकास महाजन (९७.४० टक्के), श्रेयस गिरीश दाभाडे (९७.४० टक्के), योगिता राजाराम राठोड (९७.२० टक्के), प्रणव अनिल (९६.६ टक्के), प्रियांशू संजय सूर्यवंशी (९६.६ टक्के).
संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ, चेअरमन संजय वाघ, संस्थेचे व्हा. चेअरमन व्ही. टी. जोशी, संस्थेचे मानद सचिव महेश देशमुख, शाळेचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, मुख्याध्यापक सुधीर पाटील यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि शिक्षकांनी या विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या उत्तुंग यशाचे कौतुक केले आहे.
परशराम कोंडिबा शिंदे विद्यालय, पाचोरा
परशराम कोंडिबा शिंदे विद्यालयाचादेखील शंभर टक्के निकाल जाहीर झाला असून, प्रेरणा हरचंद राठोड (९८ टक्के), आदित्य प्रदीप पाटील (९८ टक्के), महेश रवींद्रसिंग पाटील (९८ टक्के), पूजा नाना पवार (९६.६० टक्के), जयेश धनराज पाटील (९७.२० टक्के), समर्थ शशिकांत सोनकुळ (९६.६० टक्के), संजीवनी अनुराग काटकर (९६.२० टक्के).
या विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष पंडितराव शिंदे, सचिव जे. डी. काटकर, उपाध्यक्ष नीरज मुणोत, प्रा. शिवाजी शिंदे तसेच मुख्याध्यापक एस. व्ही. गीते यांनी अभिनंदन केले आहे.
170721\save_20210717_145245.jpg
एसएससी परीक्षेतील गुणवंत