शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बऱ्हाटे, उपशहर प्रमुख धनराज ठाकूर, नितीन माळी, प्रवीण चौधरी, जयेश चौधरी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी २०२१ ही प्रवेश परीक्षा देणे अत्यावश्यक आहे. त्या दृष्टीने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, नियमित शुल्कासह अर्जाची ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी ८ जून ते ७ जुलै २०२१ पर्यंत तर विलंब शुल्कासह अर्जाच्या नोंदणीसाठी ८ जुलै २०२१ ते १५ जुलै २०२१ असा कालावधी दिला आहे.
या परीक्षेच्या ऑनलाइन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहितीपुस्तिका राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांकडून या प्रवेश परीक्षेचे अर्ज भरण्यात बऱ्याचदा चुका होत असतात आणि धावपळही होत असते. त्यादृष्टीने शहर शिवसेनेने एमएचटी-सीईटी २०२१ साठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. हे अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवर्गाशी संबंधित कागदपत्रे, ओळखपत्र/आधार कार्ड, फोटो आणि अर्जाचे शुल्क भरण्यासाठी एटीएमसोबत आणणे आवश्यक आहे, असे आवाहन करण्यात आले आहे.