जळगाव- शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परिक्षा कक्षामार्फत ४ जुलै ते ५ आॅगस्ट या कालावधीत घेण्यात येणारी एमएचटी-सीईटी २०२० ही परिक्षा महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली आहे.कोरोनाची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि स्वास्थ रक्षणाच्या दृष्टीकोनातून सदर परिक्षेची पुढील तारीख जाहीर करण्यात येईल. असे एमएचटी-सीईटीचे केंद्रप्रमुख तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
४ जुलैपासून सुरू होणारी एमएचटी-सीईटीची परीक्षा स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2020 7:35 PM