चाळीसगाव, जि.जळगाव : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीने दूध उत्पादक संस्था चेअरमन, सचिव व प्रतिनिधीची कार्यशाळा वैभव मंगल कार्यालयात घेण्यात आली.अध्यक्षस्थानी दूध संघाचे संचालक प्रमोद पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक डॉ.संजीव पाटील होते. याप्रसंगी संघाचे कार्यकारी संचालक संजीवकुमार व प्रशासन अधिकारी डॉ. सी.एम. पाटील यांनी मार्गदर्शन केले.चाळीसगाव तालुक्यात जास्तीत जास्त संस्थांचे जाळे मागील तीन वर्षांत उभारले असून, नवीन आठ शीतकरण केंद्र सुरू करण्यात आले आले. चाळीसगाव तालुक्यातील वाढते दूध उत्पादन असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना चाळीसगाव येथे स्वतंत्र शीतकरण केंद्र डेअरी भागात चालू करण्यात आले आहे. याची मोठी सुविधा झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे. तसेच दूध संघाकडून पुरविण्यात येणाºया मोफत औषधी व लसीकरणाचा फायदा जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी करून घ्यावा, असे आवाहन संचालक प्रमोद पाटील यांनी या सभेत केले.याप्रसंगी सर्वोत्कृष्ट काम करण्याºया व सर्वाधिक दूध पुरवठा करणाºया संस्था प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रवीण पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक जयेश पाटील यांनी, तर आभार राहुल पाटील यांनी मानले.
चाळीसगावात दूध संस्थांची कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 3:41 PM
जिल्हा दूध उत्पादक संघाच्या वतीने दूध उत्पादक संस्था चेअरमन, सचिव व प्रतिनिधीची कार्यशाळा घेण्यात आली.
ठळक मुद्देचेअरमन, सचिव व प्रतिनिधींची उपस्थितीगेल्या तीन वर्षात दूध संस्थांचे वाढले जाळेयासाठी सुरू केली नवीन आठ दूध शीतकरण केंद्रे