शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
3
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
4
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
5
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
6
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
7
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
8
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
9
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
10
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
11
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
12
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
13
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
14
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
15
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
16
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
17
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
18
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
19
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
20
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती

गिरणा पात्र वाहतुकीसाठी कोरले जातेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 8:39 PM

एरंडोल व पाचोरा तालुक्याच्या सीमेवर गिरणा काठावर माहिजी या गावी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात रेती कोरुन रस्ता खोल करण्यात आला आहे. यामुळे मोठ्या वाहनांसह बैलगाडीचालकांना पलीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने वाहतूक बंद पडली आहे.

ठळक मुद्देयात्रेनिमित्ताने गिरणा नदीच्या पात्रात रेती कोरुन येण्या-जाण्याचा मार्ग कोरुन खोल केला यात्रेकरूंत संतापलोकप्रतिनिधींनी याप्रश्नी लक्ष द्यावेमोठ्या वाहनांसह बैलगाडीचालकांना पलीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने वाहतूक बंद पडली

प्रमोद पाटीलकासोदा, ता.एरंडोल, जि.जळगाव : एरंडोल व पाचोरा तालुक्याच्या सीमेवर गिरणा काठावर माहिजी या गावी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात रेती कोरुन रस्ता खोल करण्यात आला आहे. यामुळे मोठ्या वाहनांसह बैलगाडीचालकांना पलीकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने वाहतूक बंद पडली आहे. यामुळे यात्रेकरूंंत नाराजी व्यक्त होत आहे. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.पाचोरा तालुक्यातील माहिजी येथे पोष पोर्णिमेपासून यात्रोत्सव सुरू झाला आहे. ग्रामीण भागात मेला, यात्रा, उरुस या परंपरागत उत्सवांना आजच्या डिजिटल युगातदेखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. माहिजी यात्रा तर पर्वणीच म्हणावी. गुलाबी हुडहुडी, नदीचे भलेमोठे पात्र, त्यात यंदा भरभरून वाहणारे थंडगार पाणी यात्रेकरुंना जणू भेटीला येण्यासाठी खुणावत आहे. पायी, सायकल, बैलगाडी, मोटारसायकल यांची मोठी वर्दळ सध्या या रस्त्यावर दिसत आहे. माहिजीची ही यात्रा एरंडोल, पारोळा, भडगाव तालुक्यांतील माहेरवासीणींसाठी भेटीगाठीची मोठी पर्वणीच. त्यामुळे या चार-पाच तालुक्यातील अनेक गावांना या यात्रेचे आकर्षक आहे. परंतु एरंडोल व पारोळा तालुक्यांतील यात्रेकरुंंना गिरणा नदी ओलांडून पैलतीरावरील माहिजीच्या यात्रेला जावे लागते. माहिजी तिकडच्या काठावर तर हनुमंतखेडे या काठावरमध्ये गिरणामाई वाहते. तिच्यावर पूल नसल्याने यात्रेकरुंना नदीपात्रातूनच ये जा करावी लागते.यंदा मोठ्या प्रमाणावर पाणी असल्याने तेथे असलेल्या होडीतूनच पलीकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे. बैलगाडीतूनदेखील जाता येते. पण होडी मालकांनी नदी पात्र यंदा जेसीबी मशिनने कोरुन जास्त खोल करुन टाकल्याने आता बैलगाडीदेखील खोल पाण्यात जाऊ शकत नसल्याचा आरोप यात्रेकरुंनी केला आहे. माहिजी व हनुमंतखेडेचे तलाठी किंवा दोन्ही तालुक्यातील प्रशासनाने किमान यात्रेसाठी तरी याठिकाणी तात्पुरती रहदारीची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.माहिजी, खेडगाव, नांद्रा, लासगाव, सामनेर, दहिगाव, वरसाडे, डोकलखेडे, मोहाडी, हडसन, कुरंगी, बाम्हणे, निपाणे,पिंप्री, ताडे, जवखेडे, अंतुर्ली, तळई, कासोदा, आडगाव, मालखेडा, फरकांडे, मंगरूळ यासह पारोळा येथून येणाऱ्या नागरिकांना माहिजी येथील या नदीपात्रातूनच दळणवळणाचा हाच एकमेव जवळचा मार्ग आहे. येथे कायमस्वरूपी पूल बांधण्यात यावा, अशी खूप जुनी मागणी यापरिसरातील नागरिकांकडून नेहमी होत असते. पण अतिशय महत्वाचा हा मार्ग कायम दुर्लक्षित राहिला आहे. लोकप्रतिनिधींनी याप्रश्नी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.आमच्या गेल्या दोन पिढ्यांपासून या नदीपात्रात होडी चालवायचा व्यवसाय आहे. दीड लाखाची एक अशा दोन होड्या आहेत. नदीपात्रात किंवा पुरात काही प्रेत वगैरे वाहून आल्यास किंवा कुठलीही अडचण प्रशासनाला आल्यावर आमच्या होड्याच कामाला येतात. आम्ही सहकार्य करतो. होडी काठावर लावायला खोल जागा लागते म्हणून फक्त दोनच ठिकाणी काठावर कोरले आहे.-विष्णू तूकाराम कोळी, होडीमालक, हनुमंतखेडे, ता.एरंडोल

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीErandolएरंडोल