शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
6
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
7
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
8
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
9
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
10
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
11
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
12
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
13
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
14
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
15
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
16
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
17
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
18
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
19
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
20
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप

गिरणा धरण रब्बी आवर्तनात निम्मे खाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 1:49 AM

संजय हिरे खेडगाव, ता. भडगाव : गिरणा धरणातून मागील तीन महिने रब्बीत सिंचनासाठी आवर्तन देण्यात आले. यंदा २१५०० द.ल.घ.फु. ...

संजय हिरेखेडगाव, ता.भडगाव : गिरणा धरणातून मागील तीन महिने रब्बीत सिंचनासाठी आवर्तन देण्यात आले. यंदा २१५०० द.ल.घ.फु. म्हणजे १०० टक्के जलसाठा झाला होता. आजमितीस धरणात १२५९१ द.ल.घ.फु. इतका अर्थात मृतसाठा धरुन जवळजवळ ५०-५१ टक्के जलसाठा शिल्लक आहे.रब्बीसाठी गिरणा लाभक्षेत्रातील पाझंण, जामदा डावा-उजवा व दहीगाव कालव्यांना तीन आवर्तन देण्यात आले. ५ डिसेंबर रोजी गिरणा धरणातून आवर्तन सुरू झाले. रब्बी आवर्तनाचा कालावधी २८ फेब्रुवारीपर्यंत असतो. यात तीन आवर्तन देण्यात आले जवळजवळ ८-९ हजार द.ल.घ.फु. जलसाठा यात वापरला गेला. रब्बीसाठी सुरू असलेले आवर्तन दहिगाव व जामदा उजवा कालव्यातून थांबविण्यात आले आहे तर जामदा डावा व पांझण कालव्याचे आवर्तन शेवटच्या टप्प्यात आहे. दोन-चार दिवसात आवर्तनाचा शेवट होईल. गिरणा धरणातून मंगळवारपासून आवर्तनाचे पाणी कमी करण्यात येवून ५०० क्युसेसने सोडले जात आहे. ते जामदा डावा कालव्यातून तळई फाट्याच्या शेवटच्या सिंचनासाठी वापरले जात आहे. ते आटोपताच गिरणा धरणातून आवर्तन बंद होईल.उन्हाळी हंगाच्या नियोजनाअभावी पाणी मागणीत घटमागील व यावर्षी असे लागोपाठ दोन वर्षात गिरणा धरणात १०० टक्के जलसाठा झाला. त्याचप्रमाणे गिरणा लाभक्षेत्रातदेखील चांगला पावसाळा झाल्याने, विहिरींना जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत पाणी टिकेल, अशी स्थिती होती. हे पाहता पालकमंत्री, पाटबंधारे विभाग, कालवा समिती यांनी उन्हाळी हंगामाचे नियोजन करायला हवे होते. उन्हाळ्यात विहीरींचे पाणी कमी होते.यामुळे कालव्याचे पाणी मागणीत निश्चितच वाढ अपेक्षित होती.निदान मागील वर्षाच्या अनुभवानुसार तरी यावर्षी उन्हाळी हंगामाचे नियोजन करण्याची गरज होती.परंतु मागील पानावरुन पुढे चालू या पध्दतीने रब्बीचाच २८फेब्रुवारीचाच पाढा वाचला गेला.मागील वर्षी २७००० हेक्टरवर क्षेत्र भिजल्याचे (पाणी मागणी अर्ज आल्याचे) सांगितले गेले. यावर्षी तीस-या पाण्यानंतरची शाखा परत्वे मागणी क्षेत्राची आकडेवारी उपलब्ध झाली नसली तरी २१०००-२२००० हजार हेक्टर क्षेत्रासाठी पाणी मागणी आजवर झाल्याचा अंदाज आहे. गिरणा धरणाची रब्बीत एक लाख हेक्टरवर प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष सिंचनक्षमता असतांना दुप्पट -तिप्पट पाणी मागणी का घटली? यावरुन उन्हाळी हंगामाचे नियोजन सुरवातीलाच व्हायला हवे होते. याचा विचार नियोजन कर्त्यांनी करायला हवा.५० टक्के पाण्याचे काय करायचे?गिरणा धरणात जवळजवळ ५० टक्के जलसाठा शिल्लक आहे. पुढील चार-पाच महिने पिण्यासाठी राखीव ठेवूनही पाणी शिल्लक राहणार आहे. गहू, हरभरा आता पक्व झालेला आहे. पाच तालुक्यात उशिराने पेरणी झालेल्या पिकांना पाण्याची गरज खरोखर आहे काय?ते क्षेत्र किती? त्या शेतक-यांनी पाणी मागणी अर्ज भरलेले आहेत काय? हे तपासणे आवश्यक आहे. विहिरींची सोय असलेल्यांनीच रब्बी-उन्हाळी ज्वारी, बाजरी घेण्याची रिस्क घेतली आहे. यातील निन्म्या शेतक-यांनी पाणी मागणी अर्जच भरलेले नाहीत. कालव्यांना सोडलेल्या पाण्याचा आपसुक लाभ या शेतक-यांना होतो मग अर्ज भरण्याची तसदी ते घेत नाही.आता गिरणा धरणातील शिल्लक जलसाठा मागे ठेवायचा की या शेतक-यांसाठी सोडायचा? का २००६-२००८ या सालाप्रमाणे मे-जून असा उन्हाळी कपाशीचा फाँर्म्युला अंमलात आणायचा त्याप्रमाणे नियोजन आता करणे गरजेचे आहे.

टॅग्स :WaterपाणीBhadgaon भडगाव