वाघडू, ता.चाळीसगाव : रोकडे तांडा येथील दोन घरे फोडून चोरट्यांनी तांबे, पिंतळी भांडे व तब्बल दीड लाखाचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना बुधवारी मध्यरात्री घडली असून याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोकडे तांडा येथील दारासिंग महाराज जाधव यांनी कपाशी विकून रोख रुपये दीड लाख कपाटात ठेवले होते. सोन्या चांदीचे दागिनेही कपाटात होते. घराला कुलूप लावून कुटुंबासोबत ते ऊसतोडीसाठी कारखान्यात गेले असतांना घरी कोणी नसल्याची संधी साधत चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटामधून १० ग्रम सोने, ५० भार चांदीचे दागिने, रोकड दीड लाख असा दोनअडीच ते तीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.दुसरी चोरी धोंडू भावसिंग जाधव यांच्या घरातून झाली. त्यांचे पितळी व तांब्याचे भाडे चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोकडे तांडा येथे लाखोंचा मुद्देमाल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2019 3:52 PM