शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

दोन दुकानांमधून लाखोंचा ऐवज पळविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 11:04 AM

गजबजलेल्या वस्तीमधील दुकानांमध्ये चोरी

ठळक मुद्दे गुरख्याने केला आरोपीचा पाठलाग

जळगाव : चोऱ्या घरफोड्यांचे सत्र सुरुच असून शहरातील नवीपेठेत इंडिया फर्निश व लक्ष्मी गोल्डन हाऊस ही दोन दुकान फोडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. यात इंडिया फर्निशमधून चोरट्यांनी सव्वालाखांची रोकड तर सोने कारागिराच्या दुकानातून ग्राहकांचे दागिण्यासह रोख रक्कम असा ३० हजाराचा ऐवज लांबविला आहे. गस्त घालणाºया गुराख्यामुळे मध्यरात्रीच प्रकार उघड झाला असून चोरटा इंडिया फर्निश या दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.शहरातील नवीपेठेतील किशोर चैत्रराम तलरेजा (रा. गणपतीनगर, जळगाव) यांच्या मालकीचे नवीपेठेत इंडिया फर्निशिंगचे दुकान असून ते पडदा व सोप्याचे कापड विक्री करतात.सकाळी ९ वाजता त्यांना शेजारील दुकानदाराने चोरी झाल्याची माहिती दिली. ते तत्काळ दुकानावर आले.गुरख्याने दिली चोरीची माहितीशहरातील नवीपेठेत लालचंद नारायण रुंगठा (रा. युनियन बँकशेजारी नवीपेठ, जळगाव) यांच्या मालकीचे दुकान नं.१४५ लक्ष्मी गोल्डन हाऊस आहे. या दुकानात त्यांचा मुलगा हेमंत रुंगठा कारागिर म्हणून काम करतो. रात्री ९ वाजता ते दुकान बंद करुन घरुन निघून गेले. पहाटे तीन वाजता गुरख्याने घरी येवून दुकान फोडल्याची माहिती दिली. त्यानुसार रुंगठा यांनी पहाणी केली असता दुकानातील लाकडी ड्राव्हरमधील डब्बीत सुमारे दहा ग्रॅम सोन्याचे तुकडे व ड्रॉवरमध्ये चार हजार रुपये असा ऐवज लांबविला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर रुंगठा यांनी शहर पोलिसांना प्रकार कळविला. शहर पोलीस ठाण्याचे विजयसिंग पाटील, प्रितम पाटील यांच्यासह कर्मचाºयाने मध्यरात्री घटनास्थळ गाठून माहिती घेतली.पहाटे तीन वाजून अठरा मिनिटांनी चोरट्याने इंडिया फर्निशिंग या दुकानातील छोटे शटर तोडून दुकानात प्रवेश केला. यानंतर तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी इतरत्र कुठेही न जात थेट दुकानाची रोकड असलेल्या ड्रॉवरजवळ पोहचला. तेथून सर्व रक्कम काढून टेबलावर ठेवली. यानंतर त्याने सर्व रक्कम खिशात टाकली. व निघून गेला.चोरटा हा २० ते २५ वयोगटातील असून त्याने तोंडावर रुमाल व चष्मा घातला होता. तीन वाजून तीस मिनिटांनी त्याने ड्रॉवरमधील सर्व रक्कम बाहेर काढली. ही रक्कम घेऊन तो बॉम्बे सायकल मार्टच्या गल्लीतून जातांना सीसीटीव्ही कॅमेºयात दिसत आहे.श्वान पथकाला केले पाचारणपहाटे माहिती मिळताच श्वान पथक घटनास्थळी आले.श्वॉनाने टॉवर चौकापर्यंत मार्ग दाखविला. तसेच ठसे तज्ज्ञांनी इंडिया फर्निशिंगच्या दुकानातून चोरट्याचे ठसे घेतले. याप्रकरणी दोन्ही घटनांप्रकार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सव्वा लाखाची रोकड केली लंपासतळमजल्यातून दुसºया मार्गाने तलरेजा हे दुकानात गेले तेथे पाहीले तर सर्व वस्तू जशाच्या तशा होत्या मात्र ड्रॉव्हरमधील सव्वा लाखाची रोख रक्कम चोरट्याने लांबविली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.पोलिसांकडे घेतली धावमाघारी फिरलेला गुरखा प्रकाश हा थेट आरडा-ओरड करत शहर पोलीस स्टेशनमध्ये घुसला तेथे त्याने घडलेली माहिती सांगून पोलिसांना त्वरित चला असे सांगितले मात्र त्याला कुणीही दाद दिली नाही.गुरख्याने केला पाठलागचोरीचा हा प्रकार प्रकाश नामक गुरख्याच्या लक्षात आला. गल्लीच्या तोंडावरून त्याने शिट्टी मारून चोराचा पाठलाग सुरू केला. चोर टॉवर चौक, जनता बॅँक सेवा कार्यालयाकडे जात असताना गुरखा त्याच्या मागे धावत होता. अखेर चोरट्याने हातातील टॉमी मारण्यासाठी उगारल्याने हा गुरखा माघारी फिरला.