मतीन शेखमुक्ताईनगर, जि.जळगाव : ‘कोरोना’चे सावट, लॉकडाउन वाढता वाढे या पार्श्वभूमीवर घामाने पिकविलेल्या सोन्यासारख्या रंगीत शिमला मिरचीला मागणीच नसल्याने तालुक्यातील नायगाव, अंतुर्ली, रुईखेडा व मुक्ताईनगर शिवारात शेतकऱ्यांनी पॉलिहाऊसमधील हे पीक उपटून फेकले आहे. यामुळे लाखोंचा फटका शेतकऱ्यांंना बसला आहे.नैसर्गिक संकट कुठलेही असो पहिला फटका बळीराजालाच बसतो. वादळी वारा, गारपीट, अति तापमान, बेमोसमी पाऊस यामुळे दरवर्षी शेतकरी फटका सहन करतो आणि नव्या उमेदीने उभा राहतो. आता तर जगात पसरलेल्या कोरोना महामारीचा फटका शेतकºयांनाही बसला आहे.नायगाव, ता.मुक्ताईनगर येथील शेतकरी किरण पोहेकर यांनी आपल्या शेतात १० गुंठे क्षेत्रात पॉलिहाऊसमध्ये रंगीत शिमला (ढोबळी) मिरची लागवड केली होती. या मिरचीची मागणी महानगरांमध्ये अधिक असते. प्रयोगशील शेतकरी असल्याने एप्रिल-मेमध्ये लग्नसराईचा मुहूर्त असतो. महानगरऐवजी स्थानिक पातळीवर बाजारपेठ गाठण्याचे उद्दिष्ट ठेऊन पोहेकर यांनी सप्टेंबरमध्ये पुणे येथून रोप मागवून लागवड केली. लागवडीला बहार मार्च महिन्यापासून जोरदार लागला. पहिल्या पंधरवड्यात १२ ते १५ क्विंटल मिरची विकली गेली आणि २४ मार्चपासून लॉकडाउन सुरू होताच मिरचीला मागणीच झाली नाही. महिनाभर वाट पाहून आलेले उत्पन्न मोफत वाटले तरी घेणारे येत नव्हते आणि मिरचीचे उत्पन्न घायचे असेल तर खतपाण्याचा खर्च सुरूच होता. शेवटी ना इलाजाने त्यांनी हे पीक उपटून फेकले आहे. दरवर्षी ५ ते ६ टन मिरची उत्पन्न घेणाºया या शेतकºयाला लागवड खर्च सोडा मजुरांच्या मजुरी इतकेही उत्पन्न हाती आले नाही. डोळ्यासमोर मिरच्यांची जोमदार लाग दिसूनही ते नाईलाजाने उपटून फेकावे लागले.गेल्या तीन वर्षांपासून हा शेतकरी बँकेच्या कर्जाचा वार्र्षिक दीड लाखाचा हप्ता फेडून किमान दोन लाख शिलकी गाठत होता. यंदा तर बँकेचा हप्ताही भरला गेला नाही.याशिवाय सावदा येथील महिला शेतकरी सुनंदा सुनील चौधरी यांनी मुक्ताईनगर शिवारात तब्बल एक एकर पॉलिहाऊसमध्ये लागवड केलेली रंगीबेरंगी शिमला मिरचीही उपटून फेकावी लागली आहे. गेल्या वर्षी सात टन उत्पादन सुनंदा चौधरी यांना मिळाले होते. लॉकडाउनमुळे मिरचीला मागणीच नसल्याने त्यांनी स्वखर्चाने मिरची तोडली आणि शेता बाहेर ठेऊन, लागेल त्याला मोफत दिली. काही दिवसात मोफत घेणारेही येत नसल्यामुळे शेवटी ना इलाजाने त्यांनी पूर्ण पॉलिहाऊसमधील मिरचीचे पीक उपटून फेकले.या अगोदर अंतुर्ली येथील पुरुषोत्तम वंजारी व रुईखेडा येथील प्रा.अतुल बढे यांनीदेखील अशाच स्वरूपात मोफत मिरची वाटप केली व गेल्या आठवड्यात उपटून फेकली आहे. या लाखोंचे नुकसान या शेतकºयांना सोसावे लागले आहे.
लॉकडाउनमुळे लाखोंची शिमला मिरची उपटून फेकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2020 2:27 PM
घामाने पिकविलेल्या सोन्यासारख्या रंगीत शिमला मिरचीला मागणीच नसल्याने तालुक्यातील नायगाव, अंतुर्ली, रुईखेडा व मुक्ताईनगर शिवारात शेतकऱ्यांनी पॉलिहाऊसमधील हे पीक उपटून फेकले आहे.
ठळक मुद्देकोरोनाचा फटका बाजारपेठ नसल्याने शेतकरी झाले हतबल मजुरांची मजुरीही निघेनामोफत दिल्यानंतर घेण्यासाठीही कोणी पुढे येईना