आॅनलाईन लोकमत,जळगाव, दि.२४- राष्टÑीय महामार्ग क्र.६ च्या चौपदरीकरणासाठी मक्तेदाराला गौणखनीज परवाना देण्याची प्रक्रिया अंतीम टप्प्यात असून मक्तेदाराला १० लाख रूपये रॉयल्टी (स्वामित्वधन) भरण्याबाबतचे पत्र जिल्हा खनीकर्म अधिकाºयांनी दिले आहे. त्यामुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामास पुढील महिन्यास प्रारंभ होऊ शकेल.रस्ता चौपदरीकरण कामासाठी मक्तेदाराला गौण खनिजाची मोठ्या प्रमाणावर गरज भासते. त्यामुळे मक्तेदाराने पोखरी ता.धरणगाव येथील एक खाजगी शेतजमीनच विकत घेतली असून तेथून गौणखनिजाचा उपसा करून शासनाने मंजूर केलेल्या जागेवर या गौणखनिजावर प्रक्रिया व सिमेंट मिक्सिंगचे काम केले जाणार आहे. त्यासाठी मक्तेदाराल २५०० ब्रासचा परवाना पहिल्या टप्प्यात देण्यात येणार असून त्यासाठी ४०० रूपये प्रति ब्रास याप्रमाणे १० लाख रूपये रॉयल्टी भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मक्तेदाराने बेसकॅम्पचे बांधकामही सुरू केले आहे. त्यामुळे आता पुढील महिन्यात चौपदरीकरण कामास प्रत्यक्ष सुरूवात होण्याची अपेक्षा आहे.९५ टक्के भूसंपादन पूर्णमक्तेदार कंपनीला चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यासाठी किमान ८० टक्के भूसंपादन करून द्यावे लागते. त्यानंतर उर्वरीत भूसंपादन प्रक्रिया पार पाडली तरी चालते. त्या तुलनेत जिल्हा प्रशासनाने ९५ टक्के भूसंपादन केले आहे. तसेच मक्तेदारांना कॅम्पसाठी जागाही मिळाली आहे. शासनाकडून ‘लीज’ही मंजूर झाली आहे. केवळ जळगाव शहरालगतचे ५ टक्के भूसंपादन बाकी आहे. त्याबाबतही जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी सुरू आहे. लवकरच हा विषयही मार्गी लागणार आहे. त्यामुळे या चौपदरीकरण कामातील जवळपास सर्व अडथळे दूर झाले आहेत. त्यामुळे या कामात पुढील महिन्यात प्रत्यक्ष सुरूवात होण्याची अपेक्षा आहे.
राष्टÑीय महामार्ग चौपदरीकरण कामासाठी मक्तेदाराला गौणखनीज परवाना अखेर मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 7:49 PM
१० लाख रॉयल्टी भरण्याचे पत्र
ठळक मुद्दे २५०० ब्रासचा परवाना पहिल्या टप्प्यातजिल्हा खनीकर्म अधिकाºयांनी दिले मक्तेदाराला पत्रपुढील महिन्यात सुरू होणार काम