येथील उपजिल्हा रुग्णालयात आमदार लता सोनवणे यांच्या निधीतून दोन कोटी चार लाख पन्नास हजार रुपयाचा ऑक्सिजन प्लाँटसाठी अनुदान प्राप्त झाले आहे. त्या प्लांटचे भूमिपूजन जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. भूमिपूजन झाल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी पाटील यांनी नारायण यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला. ते म्हणाले, नारायण राणे यांना सध्या मोठा लाडू मिळाल्याने त्यांना बोलल्याशिवाय चालणार नाही आणि त्यांना केवळ बोलण्यासाठी मंत्रिपद देण्यात आले आहे. तसेच चावी भरल्याशिवाय त्यांच्याकडून बोलले जाणार नाही असा टोला त्यांनी मारला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत चोपडा येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते ऑक्सिजन जनरेशन प्लांट भूमिपूजन सोहळा झाला.
भूमिपूजन सोहळा वेळी व्यासपीठावर आमदार लता सोनवणे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष रोहिणी पाटील, तालुका अध्यक्षा मंगला पाटील, उपजिल्हाप्रमुख मुन्ना पाटील, तालुका शिवसेना प्रमुख राजेंद्र पाटील, शहर प्रमुख आबा देशमुख, चोपडा विधानसभा मतदार संघाचे संघटक व माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष नरेश महाजन आदी उपस्थित होते.
पालकमंत्री गुलाबराव पाटील त्यांच्या भाषणात म्हणाले की, चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयांमध्ये १६ खाटा या आयसीयू होण्यासाठी एक कोटी रुपये हे आमदार निधीतून तर उर्वरित एक कोटी चार लाख ५० हजार रुपये जिल्हा नियोजन मंडळातून देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात आठ हॉस्पिटलची निवड करण्यात आली होती. त्यात चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात ठरविल्याप्रमाणे ऑक्सिजन प्लांटसाठी मदत मिळवून दिली आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयाचा लूक बदलविण्याचा मानस आहे. यावेळी डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. आमदार लता सोनवणे यांनी कृती आराखड्यात चाळीस गावांमध्ये पाणीपुरवठा योजना व्हावी यासाठी मागणी केली आहे.
यावेळी याप्रसंगी प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार अनिल गावीत, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज पाटील,डॉ. गुरुप्रसाद वाघ,डॉ. सुरेश पाटील,डॉ.सपना पाटील,डॉ.तृप्ती पाटील, डॉ.नरेंद्र पाटील, डॉ.प्रदीप लासुरकर, गट विकास अधिकारी श्री. बी.एस. कोसोदे तसेच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व यावल कृउबा सभापती जिल्हा तालुका प्रमुख रवी सोनवणे, तालुका प्रमुख राजेंद्र पाटील, तालुका संघटक सुकलाल कोळी, जिप सदस्य हरीश पाटील, पं.स. सदस्य एम व्ही पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख विकास पाटील, गटनेता तथा नगरसेवक महेंद्र धनगर, किशोर चौधरी, महेश पवार, राजाराम पाटील, प्रकाश राजपूत, नगरसेविका संध्या महाजन, शहर प्रमुख आबा देशमुख,नरेश महाजन, युवासेना उपजिल्हा प्रमुख दीपक चौधरी, युवासेना तालुका प्रमुख गोपाल चौधरी, माणिकबापू महाजन, कांतीलाल आबा, जगदीश मराठे आदी शिवसैनिक उपस्थित होते. सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक राजेंद्र पाटील यांनी तर आभार आबा देशमुख यांनी मानले.