शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

गावठी पिस्टलातून गोळी सुटून अल्पवयीन मुलगा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 10:11 PM

अल्पवयीनाने गावठी पिस्टल काढत असताना त्यातून गोळी सुटल्याने ती डाव्या पायाच्या मांडीवर लागल्याने मोठा रक्तस्राव झाला.

ठळक मुद्देभुसावळातील प्रकार : लुटारूंनी हल्ला केल्याचा केला बनाव; तिघे ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : तालुक्यातील खडका येथे चौघे मित्र एका ठिकाणी बसले असतानाच त्यातील अल्पवयीनाने आपल्याजवळील गावठी पिस्टल काढत असताना त्यातून गोळी सुटल्याने ती  अल्पवयीनाच्या डाव्या पायाच्या मांडीवर लागल्याने मोठा रक्तस्राव झाला.  गुरुवारी रात्री १०.३० च्या दरम्यान ही घटना घडली. हे प्रकरण वाढून आपल्यावर गुन्हा दाखल न होण्यासाठी या  मित्रांनी या प्रकरणाला वेगळे वळण देत   खडका मिलजवळ तीन संशयितांनी लूट करण्याचा प्रयत्न केला मात्र ऐवज न दिल्याने संशयिताने गोळीबार केल्याचा बनाव करून तशी माहिती तालुका पोलिसांना रात्री उशिरा दिली.  या प्रकरणाची माहिती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन दिली.

या प्रकाराने पोलीस यंत्रणा पुरती हादरली व कामाला लागली. जखमी अल्पवयीन मुलास तातडीने उपचारार्थ गोदावरी रुग्णालयात हलविण्यात आले तर  त्याच्यासोबत असणाऱ्यांनी दिलेल्या घटनास्थळावर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व सहकाऱ्यांनी धाव घेत स्पॉट व्हेरीफिकेशन केले. मात्र, तेथे रक्ताचे डाग वा काही अप्रिय घडले नसल्याचे दिसून आल्याने पोलिसांचा संशय बळावला. 

चौकशीअंती समोर आली माहिती

अखेर जखमीसोबत असलेल्या मित्रांची खोलवर चौकशी केल्यानंतर खरा प्रकार उघडकीस आला.  लूट झाली नसल्याची कबुलीच या वेळी मिळाली. 

तिघांना अटक

लूट झाली नसताना पोलिसांना खोटी माहिती देऊन प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तालुका पोलिसांना चेतन सपकाळे, पवन सपकाळे, सचिन सपकाळे व सूरज कोळी यांना शुक्रवारी अटक केली. संशयितांनी अल्पवयीनाकडून पिस्टल हाताळताना गोळी सुटून त्याच्या पायास लागल्याची माहिती दिली. 

पिस्टल आणले कोठून? संशयिताने हे पिस्टल कुठून व कोणत्या उद्देशाने आणले? याचा खोलवर तपास पोलिसांकडून सुरू करण्यात आला आहे. पोलिसांना खोटी माहिती दिल्याप्रकरणी अल्पवयीनासह वरील चार संशयितांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी अल्पवयीनावर उपचार सुरू असून, अन्य चौघा सज्ञान आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, सहा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निरीक्षक अनिल मोरे, सहा. निरीक्षक गणेश धुमाळ, सहा. निरीक्षक अमोल पवार व कर्मचाऱ्यांनी आरोपींना ताब्यात घेतले.

टॅग्स :JalgaonजळगावBhusawalभुसावळFiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारी