पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : येथून जवळच आसलेल्या लोंढ्री बुद्रूक गावातील अल्पभूधारक शेतकºयााने शेतात विषारी द्रव्य सेवन करून जीवनयात्रा संपविलीे. विठ्ठल तुकाराम शेळके (४२) असे या शेतकºयाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडल्याने गावात व परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.मयत विठ्ठल तुकाराम शेळके हा अल्पभूधारक शेतकरी असून, पत्नीसह गुरुवारी सकाळी बटाईने केलेल्या शेतात गेले होते. मोतीआई परिसरात हे शेत आहे. पत्नीच्या समोर त्याने या शेतात थोडेसे विषारी द्रव्य सेवन केले व दुचाकीने घरचा रस्ता धरला. पत्नी ही पायदळ त्याच्या मागोमाग निघाली. विठ्ठल घरी पोहचला व पुन्हा विषारी द्रव्य सेवन करून घरात खाली पडला. त्याला उपचारास्तव पहूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले होते. तेथून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा सामान्य रूग्णालयात नेत असताना पाळधी जवळ करून अंत झाला. पहूर येथे शवविच्छेदन करून गुरुवारी दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. त्याच्या घरची परिस्थिती हलाखीची आहे. त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, आई असा परिवार आहे, प्रकाश रामदास कोलते यांच्या खबरवरून पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी जाऊन साहाय्यक फौजदार अनिल अहिरे व प्रवीण देशमुख यांनी पंचनामा केला.
लोंढ्री बुद्रूक येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 5:22 PM