चोपडा : तीन वर्षीय बालिकेचा विनयभंग करणारा आरोपी सुरेश उत्तम खोंडे यास दोन वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांची शिक्षा सुनावली. हा निकाल चोपडा न्यायालयाचे न्यायाधीश झेड. झेड. खान यांनी दिला.शहरातील तीन वर्षीय पीडित मुलगी दिसत नसल्याने तिच्या पालकांनी तिचा शोध घेतला. तेव्हा बालिकेच्या वयाचाच एका लहान मुलाने ती सुरेश उत्तम खोंडे (रा.सुंदरगढी) याच्या घरात असल्याचे सांगितले. पीडितेच्या पालकांनी आरोपीच्या घरात पाहिले असता तो बालिकेचा विनयभंग करीत असल्याचे आढळले होते. ही घटना १८ आॅक्टोबर २०१० रोजी घडली होती. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिल्यावरुन चोपडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याचा तपास सहाय्यक फौजदार विकास जोशी यांनी केला. खटल्याचे कामकाज चोपडा न्यायालयात चालले. यात चार साक्षीदार तपासण्यात आले. न्यायाधीश झेड.झेड.खान यांनी आरोपीस दोन वर्षाची सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे गजानन खिल्लारे यांनी काम पाहिले. त्यांना हवालदार अंबादास सैंदाणे, संदीप निळे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)
बालिकेचा विनयभंग करणाºयास सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2017 12:11 AM