जळगाव : छाया किडनी केअर आणि रिलीफ फाउंडेशन आणि सुखकर्ता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अवयवदान दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, जनऔषधवैद्यक शास्त्र विभाग प्रमुख डॉ. योगिता बावस्कर, डॉ. विजय गायकवाड, डॉ. नरेंद्र ठाकूर उपस्थित होते. डॉ. अमित भंगाळे यांनी प्रस्तावना केली. प्रसंगी अवयवदान करणारे धनराज फुलचंद ललवाणी, मंगला दिगंबर कोल्हे यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी त्यांचा देहदानाचा फॉर्म भरून सुपूर्द केला.
विद्यार्थी श्रीकांत केदार यानेही मनोगत व्यक्त केले. रांगोळी व पोस्टर स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांनां गौरविण्यात आले. सूत्रसंचालन लीना लेले यांनी तर आभार डॉ. धर्मेंद्र पाटील यांनी मानले. परीक्षण डॉ. अंजली वासडीकर, डॉ. शैला पुराणिक यांनी केले. डॉ. गीतांजली ठाकूर, डॉ. नेहा भंगाळे, किशोर सूर्यवंशी, मुसा शेख, डॉ. संदीप सूर्यवंशी आदी उपस्थित होते.