धुळे : महिला कर्मचा:याचा विनयभंग केल्याप्रकरणी राज्य परिवहन महामंडळाचे धुळे येथील विभाग नियंत्रक राजेंद्र आत्माराम देवरे यांच्याविरुद्ध गुरुवारी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चालक पतीच्या निधनानंतर फिर्यादी महिला अनुकंपा तत्त्वावर शिपाई पदावर रुजू झाल्या होत्या. 30 ऑक्टोबर 2015 रोजी लेबर सेक्शनमध्ये असताना विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांनी कामानिमित्त त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावले. फाइल देण्याच्या बहाण्याने त्यांनी महिलेचा विनयभंग केला. या प्रकाराची विशाखा समितीमार्फत चौकशी सुरू आहे. मात्र न्याय मिळणार नाही म्हणून पीडित महिलेने गुरुवारी फिर्याद दाखल केली.
विभाग नियंत्रकांकडून महिलेचा विनयभंग
By admin | Published: January 15, 2016 12:24 AM