शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

पर्यायी रस्त्यांकडे मनपाचे सपशेल दुर्लक्ष

By admin | Published: February 14, 2017 1:04 AM

ठिकठिकाणी अतिक्रमणे : अग्रवाल हॉस्पीटल ते इच्छादेवी पर्यायी रस्त्याची दैना; दुरुस्ती करण्यास अडचण काय?

जळगाव : राष्ट्रीय महामार्गाला पर्याय ठरू शकतील असे काही रस्ते शहरात आहेत मात्र त्यांची प्रचंड दैना झाली असल्याने नागरिकांना नाईलाजास्तव महामार्गाचाच वापर करावा लागत आहे. समांतर रस्ते हे ‘नही’च्या ताब्यात असल्याने तसेच आर्थिक परिस्थिती नसल्याने मनपाने हात झटकले आहे मात्र पर्यायी रस्ते मनपाच्याच ताब्यात असून, ते तयार करण्यास कोणतीही अडचण नसताना मनपाचे या पर्यायी रस्त्याकडे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.महामार्गावरील वाढत्या रहदारीमुळे गेल्या वर्ष दीड वर्षात अनेक अपघात होऊन शेकडो निष्पाप व्यक्तींचे बळी गेले आहेत. महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत असते. त्यातच शहरातील वाहतूकही या मार्गाने वाढल्याने समांतर रस्त्यांच्या कामांची मागणी आहे.  समांतर रस्ते मनपा करू शकत नसल्याचे कृती समितीच्या सदस्यांनी महापौर नितीन लढ्ढा यांची भेट घेतली असता स्पष्ट करण्यात आले आहे. या कामासाठी होणारा खर्च मनपास परवडणारा नाही व रस्त्याची जागाही मनपाच्या ताब्यात नसल्याचे लढ्ढा यांनी सदस्यांना सांगितले.मनपा समांतर रस्ते करू शकत नसेल तर किमान जे रस्ते मनपाच्या हद्दीतून जातात व ते महामार्गाला पर्यायी ठरू शकतात अशा रस्त्याची देखभाल व दुरूस्ती करणे आवश्यक असताना त्याकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहनांचा ताण वाढत                    आहे. महामार्गावरील वाहनांचा ताण कमी होईलमहामार्गावरील डॉ.विश्वेश अग्रवाल यांच्या हॉस्पीटलपासून तर गणपती हॉस्पिटल, मजूर फेडरेशन, राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यालय पुढे सरळ इच्छादेवी चौकार्पयत महामार्गाला पर्यायी ठरणारा आहे. हा एक महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरील काही अतिक्रमणे मनपाने यापूर्वी काढलीही आहेत. त्यामुळे हद्दीचा वाद येथे होऊ शकत नाही. निलॉन्स पासून सुरू होणा:या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. मोठमोठे खड्डे, चढउतार, मध्येच कचरा पेटय़ा, त्यातून बाहेर पडलेला कचरा, खाद्य पदार्थ विक्रेत्यांनी लावलेल्या रिकाम्या गाडय़ा, प्रभात चौकातून गणपती हॉस्पिटलकडे जाताना वाळू, विटा, खडी विक्रेत्यांनी थाटलेला रस्त्यावरील व्यवसाय, मजूर फेडरेशनसमोरील व्यासायिकांचे अतिक्रमण आहे. त्यामुळे या रस्त्यावरुन वाहनांची फारशी ये-जा नसते. या रस्त्यावरील अडथळे दूर केल्यास महामार्गावरील वाहनांचा ताण कमी होईल. रस्त्यानजीक या आहेत कॉलन्याया रस्त्यावर हायवे समर्थ कॉलनी, एम.जे. तसेच पॉलिटेकAीककडे जाणारा मार्ग, विद्या नगर, प्रभात कॉलनी, राष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यालयाकडील भागात मोठमोठे हॉस्पिटल, आदर्श नगर, गणपती नगरकडे जाणारे उपरस्ते येतात. रस्ता चांगला झाल्यास हजारो नागरिक महामार्गाकडे जाण्याऐवजी या पर्यायी मार्गाचा वापर करू शकतात. दोन ठिकाणी दारूचे दुकानरस्त्यावर प्रभात चौकानजीकच्या  एका अपार्टमेंटमध्ये तळमजल्यावर दारू विक्रीचे दुकान आहे. नजीकची दुकाने बंद असल्यामुळे तळीराम या दुकानांच्या ओटय़ावर बसून दिवसा दारू पिताना दिसतात. हीच परिस्थिती इच्छादेवी चौकाकडेही दिसते. महिला या भागातून जाणे टाळतात.‘लोकमत’ची भूमिकाराष्ट्रीय महामार्गालगतचे समांतर रस्ते हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या ताब्यात असल्याने त्याची दुरुस्ती महापालिका करु शकत नाही तसेच या रस्त्यावरील अतिक्रमणेही हटवू शकत नाही, असे महापौर नितीन लढ्ढा यांनी समांतर रस्ते कृती समितीला सांगितले व हात झटकले. मात्र महामार्गाच्या ताब्यात असलेल्या पर्यायी रस्त्यांची दुरुस्ती करण्यास अडचण काय? मनपाने शहरातील महामार्गाला पर्याय ठरणा:या अनेक रस्त्यांची दुरुस्ती केल्यास व त्यावरील अतिक्रमणे हटविल्यास महामार्गावरील ताण कमी होणार आहे. दैना झालेल्या पर्यायी रस्त्याची माहिती मनपाला व्हावी व त्यांची दुरुस्ती करण्यात यावी यासाठी ‘लोकमत’ शहरातील काही पर्यायी रस्त्यांची माहिती प्रसिद्ध करीत आहे. राष्ट्रवादी कार्यालय ते इच्छादेवी चौकराष्ट्रवादी कॉँग्रेस कार्यालयापासून इच्छादेवीकडे जाणा:या रस्त्यावर मोठमोठय़ा हॉस्पिटलच्या इमारती आहेत. येथे येणा:या रूग्णांच्या नातेवाईकांच्या गाडय़ा रस्त्यावर लागलेल्या दिसतात. हा रस्ता देखील अतिशय खराब झाला आहे.