जळगाव : इंटरनेट कॉलिंगच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीने थेट महिला न्यायाधीशाच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी निलिमा किशोर पाटील (वय ३९) यांच्या मोबाईलवरुन त्यांच्या काही नातेवाईकांना २१ एप्रिलपासून सतत मिसकॉल जात होते. दोन दिवसानंतर त्यांच्या नातेवाइकांनी फोन करुन ही माहिती त्यांना दिली. दरम्यान, आपण मिस कॉल केलेला नसतानाही मोबाईल नंबरचा गैरवापर होत असल्याचे २३ रोजी न्यायाधीश पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी लागलीच सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बळीराम हिरे तपास करीत आहेत.
----------