एरंडोल : नंदूरबार येथील ठेकेदार नरेंद्र डीगलमल जैन तसेच सर्व दुय्यम निबंधक नंदुरबार सी. पी. चौधरी यांच्याविरुद्ध जनरल मुख्त्यारपत्राचा दुरुपयोग फसवणूक करून लाखो रुपयांचा प्लॉट गिळकृत केल्याप्रकरणी नंदूरबार न्यायालयात फौजदारी खटला दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नंदुरबार शिवारातील सर्व्हे नंबर २१४/१/वा एचएस९पीजी साईट नंबर ३२चा प्लाॅट ठेकेदार नरेंद्र जैन यांनी बोगस बनावटी खरेदीखत करून गिळंकृत केल्याप्रकरणी फसवणूक झाल्याबाबत त्यांच्याविरुद्ध तसेच संगनमत केल्यामुळे सहदुय्यम निबंधक, नंदूरबार सी. पी. चौधरी यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम भारतीय दंड संहिता कलम १६६, १६७, ४१५, ४१९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, ५०४, ५०६सह ३४ नुसार फौजदारी कीअर्ज ३७५/ २१चा दाखल केला आहे.
फिर्यादीतर्फे मोहन शुक्ला व सुजित पाठक हे काम पाहत आहेत.