‘मियाँ, रोते क्यो, तो बोले सुरतही वैसी’ हा मराठीत रूढ झालेला हिंदी वाक्प्रचार. खरे म्हणजे उर्दू भाषेच्या जन्माबरोबरच जन्माला आलेला असावा. पण माङया दुष्टबुद्धी, निकटस्नेही, नानाच्या मते, तो माङया जन्माच्या नंतर विसेक वर्षानी माङयाकडे बघून लोकांनी मराठीत जन्माला घातला असावा आणि नंतर तो इतर भाषा भगिनींनी, धर्मातरित करून घेऊन भाषांतरीत केला असावा. एखादा माणूस दिसतो बावळट. म्हणजे तो असतो हो बावळट असा नानाचा ठाम समज आहे आणि तो माङयामुळे आहे असे त्याचे ठाम मत आहे. अर्थात यात थोडेफार तथ्य आहे. जरा पांढरी, खुरटी दाढी वाढवून, गावातल्या प्रत्येक कार्यक्रमाला पहिल्या रांगेत जाऊन बसलो आणि लगेच ‘लेखन डिसेंट्री’ लागल्यासारखे मिळेल त्या ‘पेपरा’वर ते रोज ‘रिकामे’ करू लागलो की, लोक आपल्याला विचारवंत वगैरे समजायला लागतात हे खरे आहे. पण नानाला हे मान्य नाही. तो म्हणतो, ‘लेका, तू कसला विचारवंत?’ खाल्लेलं नीट पचवावं लागतं, त्यावर सखोल चिंतन मनन करावं लागतं. तू तर रात्री भाषण ऐकलंस की सकाळी ‘पेपरावर’ दिसतोस. मी काही चांगलं करू शकतो यावर नानाचा विश्वासच नाही. त्याची सगळी मते ‘मिया की सुरत’वर आधारित. मी त्याला म्हटलं, नाना, मी फेरारी कार घेतली. यावर तो फिस्स करून हसत म्हणाला, छोटय़ाशा खोलीत शिकवण्या घेणा:याने, शिक्षण महर्षी झाल्याचे स्वप्न पाहू नये आणि लेका फेरारी कारमध्ये बसून तो काय फाईवस्टार हॉटेलसमोर भीक मागायला बसणार आहेस? ‘भीùùù क? अरे स्वत:च्या बंगल्यात, स्वत:साठी ‘बार’ डिझाईन केलाय मी , आहेस कुठे? यावर नाना कुत्सीतपणे हसत म्हणाला, त्यातसुद्धा लेका तू प्रत्येक बाटलीत हातभट्टीचीच दारू भरून ठेवशील. त्यापेक्षा असं कर ना, तुङया त्या सोकॉल्ड अलिशान बंगल्यात ‘बार’च्या जागी भिलाटीचाच सेट लावना म्हणजे तुला सगळे सवयीचे वाटेल. जोवर नायक म्हटला की, तो देखणा, बलदंड देहाचाच असणार. समुपदेशक म्हटला की, तो तेज:पुंज चेह:याचाच असणार. असली समीकरणं नानाच्या डोक्यात बसली आहेत. तोवर कर्तृत्ववान महिला पंतप्रधान ‘गुंगी गुडिया’ म्हणून हिणवली जाणार आणि दिसायला सामान्य असणा:या समाजसेवकाचा ‘वाकडय़ा तोंडाचा गांधी’ असाच उल्लेख होणार. जोवर ‘मिया की सुरत’वरूनच त्याच्या सिरतचाही अंदाज बांधण्यात येईल, तोवर ‘वेष असावा बावळा, परी अंतरी नाना कळा’ असलेली मंडळी समाजाला गंडवतच राहणार आणि नाना सारखं माङयावर फिस्सकन हसतच राहणार. कारण-- ‘जुनी घेतली मी ‘फेरारी’ वगैरे मुळी कर्ज न करता, उधारी वगैरे मला न पुसता नाना म्हणाला, जिंकला असेल हा जुगारी वगैरे अरे, हा पिवुनी ‘फेरारी’त आला उगा शोधिल्या की गटारी वगैरे ‘पेगा’वरी ‘मोल’ करा रे याचे आणि टॅक्स घ्या ‘अबकारी’ वगैरे तिथे तर दुपारी नशा येत नाही नसे बारबाला दुपारी वगैरे मी चिडून म्हटलं, ‘नान्या मी तुला ठार करीन’ तर तो निर्लज्जपणे म्हणतो कसा- ‘सुगंधी असावी खुनाची सुपारी खुन्याला न यावी शिसारी वगैरे’ नानाला कोणी सांगावं, की बाबा रे, दुमरुखलेल्या चेह:याचा म्हणून ज्यांचा सदैव उपहास करण्यात आला. त्या कवी केशवसुतांनी म्हणून ठेवले आहे की, माङया कवीला रसिक वाचतील तेव्हा कोणीही विचारणार नाही की ‘कवी तो होता कसा आननी’
मियाँ, रोते क्यो, तो बोले सुरतही वैसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 4:51 PM