लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी आरोप करण्यापुर्वी कायदेशिर बाबी समजूून घेणे महत्वाचे आहे. आम्ही शेतकºयांच्या बाजूू न्यायालयात मांडली. त्यात आम्हाला यश आले. तसेच ही बाजूू मांडण्यासाठी आमचे शुल्क व पावतीसह घेतले. त्यामुळे संबधित शेतकºयांकडून कमीशन घेण्याचा कोणताही प्रश्न निर्माण होत नाही. आमदार भोळे यांचे आरोप चुकीचे असल्याची माहिती अॅड.नारायण लाठी यांनी ‘लोकमत’ दिली.
सुरेश भोळे यांनी रविवारी भाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शिवाजीनगरातील जागा भूूसंपादित करण्यासाठी अॅड.नारायण लाठी यांनी संबधित शेतकºयाडून ६० टक्के कमीशन घेतल्याचा आरोप केला होता. याबाबत ‘लोकमत’ ने अॅड.नारायण लाठी यांची बाजू ऐकून घेतली. यामध्ये नारायण लाठी यांनी आरोप फेटाळले आहेत. तसेच शिवाजीनगरातील जागेसाठीचा मोबदला शेतकºयांना न्यायालयीन लढ्यानंतर मिळाला आहे. त्यातही मनपाने १४ कोटींच्या मोबदल्यात केवळ ७ कोटी रुपये दिले आहे. अजून ७ कोटींची रक्कम मनपाने दिलेली नाही. त्यामुळे ही रक्कम देखील देण्याचे आदेश न्यायालयाने मनपाला दिले आहेत. दरम्यान, शेतकºयांची बाजू मी न्यायालयात मांडली. यासाठी रितसर माझे शुल्क आकारले आहे. त्यामुळे कमीशन घेतले हा आमदारांचा आरोप चुकीचा आहे. तसेच वकिलाची नार्कोटेस्ट करावी असे आमदारांचे वक्तव्य देखील चुकीचे आहे. आमदार सुरेश भोळे यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यामध्ये आमदार भोळे यांनी कायदेशिर बाबी समजून घेतल्या पाहिजेत असे ही अॅड.लाठी यांनी सांगितले.
जागेचा मोबदलाच मिळाला नाही - रुपेश लुंकड
सागर पार्कबाबत सुप्रिम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तसेच मोबदल्यासाठी आम्ही कोणताही अर्ज देखील केला नसल्याचा खुलासा रुपेश लुंकड यांनी केला आहे. सागरपार्कची जागेचा मालकी हक्क लुंकड परिवाराचा असल्याचे लुंकड परिवाराकडून सांगण्यात येते. याबाबत न्यायालयीन आदेशानुसार ही जागा मनपाला प्राप्त झाली आहे. मात्र, सोमवारी आमदार भोळे यांनी पत्रकार परिषदेत सागर पार्कच्या जागेसाठी १०० कोटींची मागणी केली जात असल्याच्या आरोपानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. याबाबत रुपेश लुंकड यांनी ‘लोकमत’ ला सांगितले की, कोणताही मोबदला आम्हाला मिळाला नसून यासाठी अर्ज देखील केलेला नाही. आमदार भोळे यांनी आरोप करताना कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. ते त्यांनी सादर करावेत असे ही लुंकड यांनी सांगितले.
मनपाकडून काहीही विचारणा नाही - अॅड.मुजूमदार
मनपाचे विधी तज्ज्ञ अॅड.आनंद मुजूमदार यांना याबाबत विचारणा केली असता, मनपाकडून याबाबत कोणतेही पत्र किंवा सल्ला मागण्यात आलेला नाही. तसेच आयुक्तांनी देखील या प्रकरणी माझ्याशी चर्चा केली नसल्याची माहिती अॅड.मुजूमदार यांनी ‘लोकमत’ ला दिली.