भुसावळ : दीपनगर औष्णिक प्रकल्पात स्थानिक रोजगारांना संधी द्यावी, अशी मागणी मनसेने केली आहे.कोरोना लॉकडाऊन काळात अनेक सुशिक्षित बेरोजगारांचे हातचे रोजगार गेले आहे. दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील ६६० मेगावॅट प्रकल्पात स्थानिकांना रोजगाराची संधी द्यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदन दिले आहे. प्रकल्पात सद्यस्थितीला स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांना डावलून परप्रांतीय रोजगार दिला जात आहे, हे मराठी माणसावर अन्याय असल्याचे मनसेने दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. स्थानिकांना प्रकल्पात रोजगाराची संधी न दिल्यास लवकरच मनसे स्टाईलने आंदोलन केला जाईल, असे मनसे शहराध्यक्ष विनोद पाठक यांनी कळविले आहे.