ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.26 - आईस्क्रीम व चॉकलेटवर ताव मारत चोरटय़ांनी दुकानातील 29 हजार रुपये किमतीचे 5 मोबाईल, चॉकलेट व कॅटबरी व रोख 3 हजार 200 असा एकून 34 हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना रविवारी सकाळी लक्ष्मी नगरात उघडकीस आली. चोरटय़ांनी कटरने दुकानाचे कुलूप तोडले आहे.
प्रवीण रमेश वारडे (रा.आरएमएस कॉलनी, जळगाव) यांनी मू.जे.महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या लक्ष्मी नगरात साई श्री मोबाईल नावाने दुकान सुरु केले आहे. त्यात मोबाईल विक्री, रिचार्जसह आईस्क्रीम, सॅँडविच, चॉकलेट, कॅडबरी असे खाद्यपदार्थ विक्री करतात. नेहमी प्रमाणे प्रवीण यांनी शनिवारी रात्री दहा वाजता दुकान बंद केले होते.
या दुकानापासून काही अंतरावर रात्रीच्या गस्तीवर असलेले रामानंद नगर पोलीस स्टेशनचे सहायक फौजदार परदेशी व वासुदेव मोरे यांना दुचाकी (एम.एच.19 बी. एस. 2000) व त्यात कॅमेरा आढळून आला होता.