मधुकर छोटू गोयर (५७ रा. गुरूनानक नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गल्लीतील मनोज रामसिंग चव्हाण यांच्याशी दोन महिन्यापूर्वी वाद झाला होता, तेव्हा पोलिसात तक्रारी झाल्या होत्या. मात्र हा वाद आपापसात मिटविला होता. १ जानेवारी रोजी रात्री १० वाजता मधुकर गोयर हे मनोज चव्हाण यांच्या घरी गेले व तुमचा मुलगा आदर्श याने महिलेला दुसऱ्याच्या हातून मोबाईल नंबर का दिला याचा जाब विचारला असता चव्हाण याची पत्नी अनिता चव्हाण यांनी मधुकर गोयर यांना शिवीगाळ व लोखंडी रॉडने मारहाण केली. यात गोयर हे जखमी झाले. वडिलांना मारत असल्याचे पाहून नितीन मधुकर गोयर आणि राकेश मधुकर गोयर हे भांडण सोडवत असतांना दोघांनाही बेदम मारहाण केली. मधुकर गोयर यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलिसात मनोज रामसिंग चव्हाण, अनिता मनोज चव्हाण, आदर्श मनोज चव्हाण, मनोज चव्हाणची मोठी मुलगी (पुर्ण नाव माहित नाही) सर्व रा. गुरूनानक नगर यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक विठ्ठल ससे करीत आहेत.
दुसऱ्या फिर्यादीत अनिता मनोज चव्हाण (वय ४५ रा. गुरूनानक नगर) यांनी म्हटले आहे की, १ जानेवारी रोजी रात्री १० वाजता त्यांचा मुलगा आदर्श याला राकेश मधुकर गोयर याने मारल्याचे घरी सांगितले. याचा जाब विचारण्यासाठी अनिता चव्हाण विचारण्यासाठी गेल्या असता त्यांना नितीन मुधकर गोयर येवून अनिता चव्हाण, आदर्श चव्हाण आणि त्यांच्या मुलींना शिवीगाळ करून मारहाण केली. यात पियुष मधुकर गोयर याने हातातील लोखंडी रॉडन घरासमोर लावलेले दुचीकी तोडफोड करून नुकसान केले. तसेच राकेश मधुकर गोयर याने हातात चाकू घेवून आदर्शवर वार करण्याच्या तयारीत असतांना अनिता यांनी अडविला व त्यात त्यांच्या हातावर वार झाले. त्यात त्या जखमी झाल्या. तसेच गोयर यांच्या घरीत सर्व सदस्यांनी मारहाण केली. अनिता चव्हाण यांच्या फिर्यादीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात राकेश मधुकर गोयर, नितीन मधुकर गोयर, पियुष पंडीत गोयर, हेमंत पंडीत गोयर, सुनिल राजू सोनवाल, मधुकर छोटू गोयर, काजल नितीन गोयर, सुरेखा पंडीत गोयर अश्या आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपनिरीक्षक खेमराज परदेशी करीत आहेत.