जळगाव : रेल्वे प्रवाशांचा मोबाइल लांबविणा:या चोरटय़ांनी रविवारी संध्याकाळी नरेश चंद्रप्रकाश जैस्वाल (22, रा. पैठणगेट, औरंगाबाद) या विद्याथ्र्याचा बळी घेतला. जळगाव रेल्वेस्टेशनजवळ नरेशच्या हातातील मोबाइल रेल्वेबाहेरच्या एका चोरटय़ाने ओढण्याचा प्रय} केला. त्यात रुळावर पडून नरेशचा मृत्यू झाला. नरेश जैस्वाल व अपूर्व जानबा हे ग्वाल्हेर येथे हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहेत. सोमवारपासून परीक्षा सुरू होणार असल्याने हे दोघेही सचखंड एक्सप्रेसने ग्वाल्हेरला जाण्यासाठी औरंगाबाद येथून बसले. ही गाडी जळगावहून निघाली असता नरेश मोबाइलवर बोलण्यासाठी डब्याच्या दरवाजाजवळ गेला. तेवढय़ात रेल्वेच्या बाहेरून कोणीतरी त्याच्या हातातील मोबाइल ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र यात नरेशच खाली ओढला जाऊन रेल्वेखाली आला. अपूर्व याने साखळी ओढली आणि तिकीट तपासनीस व काही लोकांना नरेशला रुग्णालयात हलविण्याची विनंती केली. तो बॅग परत घेऊन घटनास्थळी येईर्पयत तिकीट तपासनीस गायब झाला होता. इतर काही नागरिकांनी रेल्वे पोलिसांना कळवून रुग्णवाहिकेद्वारे नरेशला जिल्हा रुग्णालयात हलविले. आठवडाभरापूर्वी अशाचप्रकारे एक प्रवासी खाली पडून जखमी झाला होता. शिरसोली रेल्वे स्थानकावर रुळात अडकलेल्या पायावरून रेल्वे गेल्याने जगदीश चंद्रभान पवार (35, रा. कढोली, ता. एरंडोल) या मजुरी काम करणा:या तरुणाचा उजवा पाय कापला गेला. तो शिरसोली येथे लग्नाला गेलेला होता. रेल्वे रूळ ओलांडत असतानाच नेमक्या बदलल्या जाणा:या रुळाच्या सांध्यांमध्ये त्याचा पाय अडकला. रेल्वेच्या कर्मचा:यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात हलविले. चाळीसगावचा तरुण गंभीरचाळीसगाव येथून काशी एक्सप्रेसने जळगावला येत असताना परवेज उर्फ मुन्ना शेख (26, रा. चाळीसगाव) हा तरुण रेल्वेतून खाली पडल्याने गंभीर जखमी झाला. प्रकृती गंभीर असल्याने त्यास खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
मोबाइल चोरटय़ांनी घेतला युवकाचा बळी
By admin | Published: March 06, 2017 1:19 AM