जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम सत्राच्या ऑनलाईन परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने माहिती पुस्तिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. दरम्यान, विद्यापीठाने सराव चाचण्या (मॉक टेस्ट) सुरु केल्या असून बुधवारी अभियांत्रिकी विद्याशाखेच्या सराव चाचण्या पार पडल्या. विद्यापीठाने ऑनलाईन,ऑफलाईन होणा-या परीक्षेसाठी आता ६० प्रश्नांपैकी कोणतेही ४० प्रश्न सोडविण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली आहे.विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन परीक्षार्थींसाठी माहिती पुस्तिका देण्यात आली आहे. ही पुस्तिका संलग्नित महाविद्यालयांना देखील ऑनलाईन पाठविण्यात आली आहे. या माहिती पुस्तिकेत परीक्षार्थींसाठी आवश्यक ती तांत्रिक माहिती देण्यात आली आहे.२८५ समन्वयकांची नियुक्तीविद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा सुरळीत व्हाव्यात यासाठी प्रशाळा व संलग्नित महाविद्यालयात ऑनलाईन परीक्षा समन्वयकांची नियुक्ती केली आहे. जवळपास २८५ समन्वयक विद्याशाखानिहाय नियुक्त करण्यात आले असून त्यांची यादी देखील ईमेल व भ्रमणध्वनीसह संकेतस्थळावर देण्यात आली आहे. या समन्वयकांचे मंगळवारी ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा दरम्यान काही तांत्रिक अडचणी उदभवल्यास या समन्वयकांशी संपर्क साधता येईल.४४७० विद्यार्थ्यांपैकी १९२४ विद्यार्थ्यांनी दिली चाचणी परीक्षादरम्यान, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमनिहाय सराव चाचण्या (मॉक टेस्ट) घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहिर केले होते. बुधवारी अभियांत्रिकीच्या मॉक टेस्ट घेण्यात आल्या. एकूण ४४७० विद्यार्थ्यांपैकी सायंकाळी ४ वाजेपर्यंत १९२४ विद्यार्थ्यांनी ही सराव चाचणी दिली. प्रत्येक विद्याशाखानिहाय टेलिग्राम ग्रुप देखील केले जाणार असून या अॅपव्दारे विद्यार्थ्यांना वेळोवेळी सूचना दिल्या जाणार आहेत अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी.पाटील यांनी दिली.
अभियांत्रिकीच्या १९२४ विद्यार्थ्यांनी दिली 'मॉक टेस्ट'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 8:22 PM