जळगाव,दि.18- जी.एच.रायसोनी तंत्रनिकेतनच्या विद्याथ्र्याकडून जळगाव बस्थानकाचे नवीन पध्दतीचे नियोजन तयार करून त्याचे अभिनव मॉडेल तयार केले आहे. या बसस्थानकात इको फ्रेण्डली संकल्पनाचा समावेश आहे.
राज्यातील अनेक बसस्थानकांची अवस्था बिकट आहे. बसस्थानकांमध्ये प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध नाही. या ठिकाणी प्रवाशांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी जी.एच.रायसोनी पॉलीटेक्नीक महाविद्यालयाच्या स्थापत्य विभागाच्या हर्ष न्याती, शुभम भोळे, निर्भय भोळे, अंकित जैन व परिक्षीत चौधरी या विद्याथ्र्यानी वेळोवेळी बसस्थानकावर जावून तेथील समस्या प्रवाशांकडून जाणून घेतल्या. या अडचणी लक्षात घेवून विद्याथ्र्यानी हे मॉडेल तयार केले. या विद्याथ्र्याना प्रा.मोनाली पाटील, प्रा.व्ही.एन.बोरसे यांचे मार्गदर्शन लाभले.