शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

लोकसहभागातून उभारणार मॉडेल कोविड सेंटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 10:23 PM

चाळीसगाव येथे झाली बैठक : सर्वपक्षियांसह विविध संघटनांनी घेतली जबाबदारी

चाळीसगाव : कोरोनावर मात करण्यासाठी चाळीसगाव तालुक्यातील दानशूर व्यक्ती व सामाजिक संघटना यांनी पुढे यावे व लोकसहभागातून सर्व सोयीसुविधायुक्त जिल्ह्यातील मॉडेल असे क्वारंटाइन व कोविड सेंटर चाळीसगाव येथे उभारूया असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. महसूल प्रशासनातर्फे चाळीसगाव येथील महात्मा फुले आरोग्य संकुलात आयोजित सर्वपक्षीय व संघटनांच्या बैठकीत ते बोलत होते.आमदार चव्हाण यांनी सांगितले की, क्वारंटाइन व कोविड सेंटरसाठी आमदार निधीतून एक अत्याधुनिक रुग्णवाहिका, शववाहिका, ५० बेडसाठी आॅक्सिजन सुविधा लवकरच उपलब्ध होणार आह.े क्वारंटाइन व कोविड सेंटर साठी देखील जे जे शक्य होईल ते पदर खचार्तून मदत करेल असे आश्वासन देखील त्यांनी दिले.यावेळी जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील, नगराध्यक्षा आशालताताई चव्हाण, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार अमोल मोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. देवराम लांडे, ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. पी. बाविस्कर, डॉ. सी. टी. पवार, आयएमएच्या डॉ. स्मिता मुंदडा, डॉ. दामीनी राठोड, डॉ. मंगेश वाडेकर, डॉ. लीना पाटील, डॉ. गिरीश मुंदडा, डॉ. विनय पाटील, डॉ. अरकडी, डॉ. किरण मगर , डॉ. पंकज निकुंभ, डॉ. शशिकांत राणा, जनरल प्रॅक्टिस असोसिएशनचे डॉ.महेश वाणी, डॉ. सुजित वाघ, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख महेंद्र पाटील, महावितरणचे संदीप शेंडगे, माजी नगराध्यक्ष भोजराज पुंशी, पंचायत समिती गटनेते संजय पाटील, माजी पं. स. सदस्य दिनेश बोरसे, नगरसेवक गटनेते संजय पाटील, नगरसेवक श्याम देशमुख, शिवसेना विधानसभा प्रमुख भीमराव खलाणे, सह्याद्री प्रतिष्ठानचे दिलीप घोरपडे, सामाजिक कार्यकर्ते नरेन जैन, रोटरीचे प्रकाश बाविस्कर, संमकीत छाजेड, एकनाथ चौधरी डॉ. महेश निकुंभ, डॉ. महेंद्र राठोड प्रदीप देशमुख योगेश भोकरे भास्कराचार्य स्कूलचे प्रा.उमाकांत ठाकूर, राष्ट्रीय विद्यालयाचे संचालक विश्वास चव्हाण, उद्योगपती राज पुंशी, नायब तहसीलदार विशाल सोनवणे आदी उपस्थित होते.यावेळी खासदार उन्मेष पाटील यांनी सांगितले की, लोकसहभागातून ही व्यवस्था उभारावी असा मानस आहे. यासाठी लागणारी आरोग्य उपकरणे, साधनसामुग्री , साहित्य याची त्वरित उपलब्धता व्हावी या दृष्टीने नियोजन करावे.तर इच्छुकाना या कोविड केंद्रात काम करण्याची इच्छा आहे. अशा इच्छुकांनी तालुका आरोग्य अधिकारी यांचेशी संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले.यांनी जाहीर केली मदतमहसूल व आरोग्य प्रशासनाने लोकसहभागातून मदतीचे आवाहन केल्यानंतर रोटरी क्लबतर्फे ३ सक्शन मशीन्स, पुन्शी ब्रदर्स तर्फे १० बेड्स, राष्ट्रवादीतर्फे वॉटर फिल्टर, जैन श्रावक संघातर्फे ५ बेड्स, शिवसेना तर्फे ३ बेड्स, महावितरण चाळीसगाव तर्फे ५ बेड्स, स्वस्त धान्य दुकानदार यांच्या वतीने २ बेड्स अशी मदत जाहीर करण्यात आली. तसेच अनेक दात्यांनी देखील मदत जाहीर केली.