शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

मोदी आणि महाजनांचा करिष्मा पुन्हा चालेल...?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:32 AM

जामनेर तालुका वार्तापत्र

जामनेर : लोकसभा निवडणुकीची व संभाव्य उमेदवारांची चर्चा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते करीत आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल मतदारांची मानसिकता बदलवतील काय? पाच वर्षापूर्वी असलेली नरेंद्र मोदींची लाट यावेळी असेल काय? याचीच चर्चा तालुक्यातील मतदार करतांना दिसत आहेत. भाजपा शिवसेनेची युती झाली खरी, मात्र कार्यकर्त्यांच्या मनातील दुरावा काही कमी झालेला दिसत नाही. राष्ट्रवादी-काँंग्रेस आघाडीतही अद्याप शांतता आहे.जामनेर मतदारसंघ लोकसभेच्या रावेर मतदार संघात येतो. हा मतदार संघ गेल्या २५ वर्र्षांपासून भाजपाकडे आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन याचे नेतृत्व करीत आहेत. ७० टक्के ग्रामपंचायतीवर भाजपाचे वर्चस्व आहे. जि.प.चे सहा गट व पं.स.चे १० गण भाजपाकडे आहेत. जामनेर व शेंदुर्णी नगरपंचायतवर देखील भाजपाचेच बहुमत आहे. २०१४ च्या निवडणुकीत तालुक्याने भाजपच्या रक्षा खडसे यांना ३९ हजार मतांची आघाडी दिली होती. मोदींची क्रेझ व महाजनांची मोहिनी मतदारांवर होती. खडसे खासदार झाल्यानंतर त्यांनी मतदार संघासाठी शासकीय निधीतील कामांव्यतीरिक्त पाचोरा- जामनेर या नॅरो गेज रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्यासाठी पाठपुरावा केला. हा मार्ग जामनेरहून मलकापूरपर्यंत वाढविण्यासाठी सर्वेक्षण यावर्षी पूर्ण झाले ही जमेची बाजु म्हणावी लागेल. एक बुथ दहा युथ या पक्षीय कार्यक्रमांच्या निमित्ताने त्या मतदार संघात होत्या. २०१४ च्या निवडणुकीत त्यांना तालुक्यात पहिल्या क्रमांकाची मते मिळाली होती.जामनेर वराज्य व सहकारी संस्थांवर भाजपाचे वर्चस्वजामनेर तालुक्यात जिल्हा परिषदेचे सात गट असुन त्यातील सहा भाजपकडे तर दोन राष्ट्रवादीकडे आहेत. पंचायत समितीचे एकुण १४ गण असुन दहा भाजपकडे तर ४ राष्ट्रवादीकडे आहे. सभापतीपद भाजपकडेच आहे.तालुक्यातील जामनेर नगरपालीका व शेंदुर्णी नगरपंचायत भाजपकडे आहेत.जामनेर नगरपालिकेतील सर्व २४ जागांवर भाजपचे नगरसेवक आहेत. शेंदुर्णी नगरपंचायतीतील एकूण १७ पैकी १३ जागा भाजपकडे, ३ राष्ट्रवादी व एक काँग्रेसचा नगरसेवक आहे.जामनेर बाजार समिती आणि शेतकी संघावर भाजपाचे सभापती तर शेंदुर्णी जीनप्रेस, शेंदुर्णी फ्रूटसेल आणि जामनेर जीनप्रेसवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आहे.

टॅग्स :Politicsराजकारण