धुळे : शहरातील मोहाडी उपनगरातील जयशंकर कॉलनीत रविवारी रात्री दोन गटात तुफान दंगल झाली़ त्यात दगडफेकही करण्यात आली़ तसेच तलवारी, लाठय़ा-काठय़ा, लोखंडी पाईप, बेसबॉलचे दंडे यांचा सर्रास वापर करण्यात आला़ त्यात 9 जण जखमी झाले असून वाहनांचेही नुकसान झाले आह़े याबाबत परस्परविरोधी तक्रारीवरून 80 ते 90 जणांविरुद्ध मोहाडी पोलिसात गुन्हा करण्यात आला आह़े. पूर्ववैमस्यातून ही दंगल झाल्याचे समोर येत आह़े विठ्ठल पंढरीनाथ गावडे (वय 48, रा़जयशंकर कॉलनी, मोहाडी उपनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 3 एप्रिल रोजी रात्री 10़45 वाजेच्या सुमारास जीवन पाटीलसह 60 ते 62 जण हातात लोखंडी पाईप, बेसबॉलचे दंडे, लाठय़ा-काठय़ा, दगड घेऊन सुनील भानुदास गावडे यास शिवीगाळ करत मारहाण करत होत़े तेव्हा विठ्ठल गावडे हे दुचाकीने जात असताना थांबल़े त्यानंतर देवीदास पाटील याने त्यांच्या डोक्यात दगड मारला, तर किशोर पाटील व वाल्मीक पाटील यांनी देवीदास यांना दुचाकीवरून ढकलून दिल़े तसेच श्याम पाटील यास हातात तलवार घेऊन येताना पाहिले होत़े भानगडीत संदीप एकनाथ गावडे व भूषण ज्ञानेश्वर पाटील हेदेखील दगड लागल्याने जखमी झाल़े या फिर्यादीवरून जीवन देवीदास पाटील, किशोर यशवंत पाटील, श्याम यशवंत पाटील, वाल्मीक यशवंत पाटील, ज्ञानेश्वर यशवंत पाटील, विजय रामचंद्र पाटील, दादू सुर्यभान पाटील, सुर्यभान पाटील, बंटी सूर्यभान पाटील, विष्णू पाटीलचा जावई, सागर नंदकिशोर पाटील, रवींद्र नारायण देवगावकर तसेच त्यांच्यासोबत 40 ते 50 जण (सर्व रा़ जयशंकर कॉलनी) यांच्याविरुद्ध भादंवि कलम 143, 147, 148, 149, 337, 323, 504, 506 सह आर्म अॅक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आह़े तसेच श्याम भास्कर पाटील (वय 35, रा़ जयशंकर कॉलनी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार मागील भानगडीचा समझोता करण्यासाठी गेलेले जीवन देवीदास पाटील व रवींद्र देवगावकर यांना संदीप उचाळेसह इतरांनी धक्काबुक्की करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली त्यात श्याम पाटीलसह इतर जखमी झाल़े तसेच सुनील भानुदास गावडे याने तलवार संगीता विजय अहिरे यांच्यावर फेकून मारली़ त्यात वाहनांचे नुकसान झाल़े तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ त्यात श्याम पाटीलसह पुरुषोत्तम आनंदा कचवे, योगिताबाई श्याम पाटील, ललिता योगश पाटील, प्रियंका पाटील, विजय रामचंद्र अहिरे (सर्व रा़ जयशंकर कॉलनी) हे जखमी झाल़े याप्रकरणी संदीप पांडुरंग उचाळे, विक्की बारकू गावडे, सुनील भानुदास गावडे, भूषण ज्ञानेश्वर पाटील, नाना रमेश गावडे, दगडू रमेश गावडे, शुभम गुणवंत गावडे, संदीप एकनाथ गावडे, शुभम एकनाथ गावडे, कल्पेश भानुदास गावडे, रवींद्र बारकू गावडे, राकेश अशोक उचाळे, बापू रमेश गावडे, गोटय़ा सुरेश गावडे, सुनील उत्तम तोटे, नन्या उत्तम तोटे, अनिल उत्तम तोटे, योगेश ज्ञानेश्वर पाटील, बंटी विठ्ठल गावडे, भैया ज्ञानेश्वर पाटील व सोबत 15 ते 20 जण (सर्व रा़ जयशंकर कॉलनी) यांच्याविरुद्ध भादंवि कलम 143, 147, 148, 149, 337, 323, 504, 506, 427 सह आर्म अॅक्ट 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आह़े तपास पोलीस उपनिरीक्षक वाय़ बी़ शेख करीत आहेत़ पोलीस निरीक्षक साहेबराव पाटील, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली़ एकालाही अटक नाही दंगलप्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून 80 ते 90 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आह़े मात्र सोमवारी रात्री उशिरार्पयत मोहाडी पोलिसांनी एकालाही अटक केलेली नव्हती़